PM Modi Pune Visit Cancelled 
पुणे

PM Modi Pune Visit Cancelled : पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द; नेमकं काय आहे कारण?

Heavy rains affect PM Modi's Pune rally : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज होणारा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

रोहित कणसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नियोजित असलेला पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. प्रशासनाकडून पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. दोन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा दौरा रद्द झाल्याने पुणे मेट्रोचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे.

पंतप्रधान मोदी हे आज पुणे दौऱ्यावर येणार होते. शहरातील एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा देखील होणार होती. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे सभास्थळी मोठ्या प्रमाणात चिखळ झाला होता. या ठिकाणी मुरूम-खडी टाकून चिखल कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते. पण ते यशस्वी न झाल्याने सभेचे स्थळ बदलले जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र आज देखील पुण्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे पीएम मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पुणे दौऱ्यावळी पंतप्रधान मोदी दोन मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी करणार होते. यामध्ये स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचा विस्तार आणि पिंपरी चिंचवड ते निगडी असा कॉरिडॉर यांचा समावेश होता. तसेच दिवाणी न्यायालय ते स्वारगेटपर्यंत धावणाऱ्या भूमिगत मेट्रो मार्गाचे लोकार्पण देखील मोदींच्या हस्ते होणार होते. मात्र आजचा त्यांचा दौरा रद्द झाल्याने हा कार्यक्रम लांबणीवर पडले आहे.

मुंबई पुण्यात आजही मुसळधार पाऊस

बुधवारपासूनच पुणे आणि परिसरात तुफान पाऊस होत आहे. येते १३० मिलीमीटर पाऊस झाला आहे. हवामान विभागाने गुरूवारी देखील येथे पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या नियोजित कार्यक्रमांवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले होते. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी गुरूवारी सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला होता.

आज मुंबई आणि परिसरात देखील हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येथे बीएमसीने आवश्यक काम नसेल तर घरातून बाहेर पडू नये असे अवाहन नागरिकांना केले आहे. तसेच मुंबईत देखील पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. बुधवारी मुंबई शहरात पावसाने हाहाकार उडवला होता. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते यामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती, तसेच विमानसेवा देखील प्रभावित झाली होती. दरम्यान हवामान विबागाने गुरूवारी सकाळी मुंबई आणि परिसरातील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT