PM Modi Pune Visit Sakal
पुणे

PM Modi Pune Visit : लोकमान्य होते म्हणून.. मोदींनी स्टेजवर केला सावरकरांचा उल्लेख

दत्ता लवांडे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित होते. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

"लोकमान्य टिळकांची आज १०३ वी पुण्यतिथी आहे. देशाला अनेक महानायक देणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो" अशी मराठीतून नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली आणि पुणेकरांनी जल्लोष केला. यावेळी त्यांनी सावरकरांच्या शिक्षणासाठी टिळकांचा मोठा हात होता असं यावेळी भाषणात सांगितलं.

ज्या पुरस्काराच्या नावात 'गंगा' आहे तो पुरस्कार "नमामि गंगे" यासाठी अर्पण करत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी यावेळी केली, महात्मा गांधींनीसुद्धा टिळकांना नव्या भारताचा निर्माता म्हटलं आहे. त्यांनी समाजाला जोडण्यासाठी गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सावाला सुरूवात केली. टिळकांमध्ये युवकांमधील प्रतिभा शोधण्याची जी दिव्य दृष्टी होती याची प्रचिती वीर सावरकरांशी जोडलेल्या एका किस्स्यामध्ये असल्याचं मोदी म्हणाले.

"त्यावेळी सावरकर युवक होते. टिळकांनी त्यांच्या क्षमतेला ओळखलं, त्यांना वाटलं सावरकरांनी देशाबाहेर जाऊन चांगलं शिक्षण घ्यावं आणि भारतात येऊन स्वातंत्र्यासाठी काम करावं. ब्रिटनमध्ये शामजी कृष्ण वर्मा अशाच युवकांना संधी देण्यासाठी दोन शिष्यवृत्ती चालवत होते. त्यापैकी एक होती, छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती आणि दुसरी होती महाराणा प्रताप शिष्यवृत्ती. टिळकांनी वर्मा यांच्याकडे सावरकरांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांच्या प्रयत्नामुळे सावरकर लंडनमध्ये बॅरिस्टर बनले. अशा अनेक युवकांनी त्यांनी तयार केलं" अशा शब्दांत मोदींनी टिळकांच्या कार्याचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT