PM Narendra Modi In Dehu Sakal
पुणे

मोदी तुकोबारायांचे चिरंजीव म्हणून आलेत; देहू संस्थानचे अध्यक्ष

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी संत तुकारामांच्या विशेष शैलीमध्ये बनवलेल्या पगडीचा स्विकार केला.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देहू दौऱ्यावर आहेत. या सोहळ्यानिमित्त त्यांच्यासोबत भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. या कार्यक्रमात मोदींनी संत तुकाराम यांच्या विशेष शैलीतल्या पगडीचा स्विकारही केला. (PM Narendra Modi in Dehu)

या कार्यक्रमात देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे देहूकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलं. यावेळी बोलताना त्यांनी मोदींना तुकाराम महाराजांचे चिरंजीव म्हणून संबोधलं. ते म्हणाले, "तुकोबारायांची पालखी आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तुकाराम महाराजांचे चिरंजीव तपोनिधी महाराज यांनी सुरू केली. आणि या पालखीमार्गाचा विस्तार पंतप्रधान मोदी यांनी रस्त्याचं चौपदरीकरण करुन केला. मोदीजी, आज आपण देशाचे पंतप्रधान म्हणून जरी आलेले असला तरी आमच्यासाठी तुकाराम महाराजांचे चिरंजीव तपोनिधी महाराज म्हणून तुम्ही देहूत आलेले आहात. आणि याचा सगळ्या वारकरी समुदायाला अभिमान आहे".

देहूतील संत तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर हे केवळ भक्ती-शक्तीचं केंद्र नव्हे तर सांस्कृतीक भविष्य घडवणारं मंदिर आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं आहे. आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलंय की मनुष्य जन्म हा दुर्मिळ आहे. यामध्ये संतांचा सहवास लाभला की ईश्वराचं दर्शन आपोआप होतं. देहूच्या पवित्र भूमित आल्याचं मला सौभाग्य लाभलं त्यामुळं मी देखील याची अनुभूती घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय मार्गांना चार लेन करण्याच्या शिलान्यासाची संधी मिळाली, असंही ते आज बोलताना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर फडणवीसांचा मोठा संकेत; ‘चर्चेची दारे खुली, कायदेशीर चौकटीत तोडगा काढू’

Panchganga River Incident : रक्षाबंधनाची राखी हातात अन्... बहिणीच्या डोळ्यांदेखतच भावाने पंचगंगा नदीत मारली उडी; रुई पुलावर थरार

NASA Roman: हबलपेक्षा तब्बल 1000 पट वेगवान! नासाची रोमन दुर्बीण अवकाशात; विश्वाच्या गूढ रहस्यांचा घेणार वेध

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज; 'या' तीन जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

Almatti Dam Height Controversy : कोल्हापूर-सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीची उंची 524.26 मीटर करण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध; सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

SCROLL FOR NEXT