devendra fadnavis 
पुणे

PM Modi Pune Visit: "मागच्या उद्घाटनावेळी तिघांचे रोल वेगळे होते, पण आता...", फडणवीसांचे विधान चर्चेत

Sandip Kapde

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन पूजा केली. यानंतर त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर, मोदी यांनी मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. मेट्रो उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोचा एक नवीन टप्पा आज सुरू करणार करण्यात आला. ज्या मोदीजींच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन झाले, अनावरण झाले, त्यांच्याच हस्ते दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन देखील होतं आहे, हे महत्त्वाचे आहे.  

मागच्या टप्प्याच्या उद्घाटनाला मी होतो शिंदे साहेब आणि अजितदादा देखील होते. पण तिघांचे रोल वेगळे होते. मी विरोधीपक्षनेता होतो, अजितदादा उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. पण आता मात्र पुण्याच्या स्वप्नांना गती देण्याकरिता, आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. पुणे देशातील उत्तम शहर आहेच पण मोदींच्या नेतृत्वात ते सर्वोत्तम करून दाखवू, असा विश्वास असल्याचे फडणवीस म्हणाले.

आजच्या मेट्रोचे महत्त्व म्हणजे दोन लाईन आता क्रॉस होत आहेत. त्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जाण्याकरीता मोठी मदत होणार आहे. जेव्हा वाढीव टप्प्याचे काम पूर्ण होईल तेव्हा ट्रॅफीकची समस्या कमी होईल. त्यासोबत पिएमपीएलमध्ये मागच्या काळात आपण निर्णय घेत इलेक्ट्रिक बस घेतल्या. नरेंद्र मोदी यांचे स्वप्न प्रदूषण न करणारी ट्रान्सपोर्ट पुणे शहरात होत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुणे आमची औद्योगिक नगरी आहे.  ही आयटीची नगरी आहे. या ठिकाणी स्टार्टअप कॅपिटल आहे. येत्या काळात नवीन एअरपोर्ट देखील आम्ही पुण्याला देणार आहोत. पुणे जशी विद्येची नगरी, जशी औद्योगिक नगरी आहे तशी ती स्वप्नपूर्तीची नगरी होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT