Pune Metro Video Sakal
पुणे

Pune Metro Video : पुण्यातील शिवाजीनगर मेट्रो स्थानकाची झलक! मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याची प्रेरणा, शनिवारवाडा, लाल महालाची प्रतिकृती अन् बरंच काही...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या पुणे दौरा आहे. यावेळी ते अनेक विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. पुणे मेट्रोच्या विस्तारीत स्थानकांचे उद्घाटन त्यांच्याकडून होणार असून लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी ते दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे पुणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे उद्घाटन होणार असून या स्थानकाची एक झलक समोर आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याची प्रेरणा घेऊन विकसित करण्यात आले आहे.

पुण्यातील शनिवारवाड्याच्या महाद्वाराची प्रतिकृती आणि लाल महालाची प्रतिकृती, गडांवर असणाऱ्या बुरूजांची प्रतिकृती, गडकिल्ल्यांवर असणाऱ्या भिंतीसारख्या भिंती या मेट्रो स्थानकामध्ये तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इथे गेल्यावर एखाद्या गडावर आल्याची प्रचिती येते. हे सर्वांत मोठे आकर्षण असणार आहे.

शिवाजीनगर मेट्रो स्थानक हे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असल्यामुळे तिथे कायम प्रवाशांची गर्दी असते. तर या स्थानकाला विशेष सजावट करण्यात आली आहे. पुण्याची संस्कृती आणि पुण्यात असलेल्या पर्यटन स्थळांची प्रतिकृती दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्थानकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT