पुणे

पुणे : मोदींची मूर्ती हटवली; देव चोरला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन

बाबा तारे.

पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्यानंतर मंदिर झाकण्यात आले आणि मूर्ती एका रात्रीत हटवण्यात आली.

औंध : येथील मयुर मुंडे या भक्ताने मोदींचे (narendra modi) मंदीर बांधून दैवतीकरण केले होते. अशा प्रकारे मोदींचे मंदिर उभारण्यात आल्याने चहुबाजूंनी टीका होऊ लागल्याने हे मंदिर हटवण्यात आले आहे. मोदींचे मंदिर उभारल्यानंतर मयुर मुंडे चर्चेत आले होते. याची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली.

पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्यानंतर मंदिर झाकण्यात आले आणि मूर्ती एका रात्रीत हटवण्यात आली. मंदिरावर प्लास्टिकचे आवरण टाकून झाकून टाकण्यात आले असून, मूर्ती अज्ञातस्थळी हलवण्यात आली आहे.

दरम्यान, रात्रीपासून मूर्ती गायब झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने देवच चोरीला गेल्याने आम्ही कुणाला साकडे घालायचे? आता आपल्या देशापुढील समस्या कोण दूर करणार ?, यापुढे पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाल्यावर आम्ही कोणाला साकडे घालायचे ? आमच्या नवसाला कोण पावणार ? असा सवाल उपस्थित करत पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. तर मूर्ती चोरीप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली जाणार आहे. आता तरी देव आम्हाला पावणार का? महागाई कमी करणार का? म्हणत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

Kolhapur Ambabai Temple : श्री अंबाबाईच्या ओटीत साडीऐवजी कागदाची रद्दी; भाविकांच्या श्रद्धेशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामललाच्या दर्शनाची वेळ आणि नियम अचानक बदलले; आता VIP पास सुद्धा बंद, काय आहे कारण?

'मराठी सिनेमासाठी काय करतोय?' विलासराव देशमुखांनी रितेशला विचारलेला प्रश्न, वडिलांची इच्छा सांगताना म्हणाला...'सध्या मराठी भाषेला..'

Chakan News : काळ्या ऑइलवरील शेगड्यांकडे कल; चाकण परिसरामधील छोट्या हॉटेलचालकांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT