PM Narendra Modi visit to pune police action on criminals Seized weapons pune sakal media
पुणे

पोलिसांकडून शहरातील साडे तीन हजार सराईत गुन्हेगारांची झाडाझडती

शस्त्रे, पिस्तुल व काडतुसे जप्त, हुक्का पार्लरवरही कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभुमीवर पुणे पोलिसांनी शनिवारी रात्री सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी विशेष मोहिम राबविली. त्यामध्ये पोलिसांनी शहरातील साडे तीन हजार सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यापैकी 685 जण त्यांच्या मुळ पत्त्यावर आढळले. या मोहिमेत पोलिसांनी दोन पिस्तुलांसह काडतुसे, कोयते, तवारी जप्त केल्या. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदिप कर्णिक, अतिरीक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री हि मोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, डॉ.प्रियांका नारनवरे, सागर पाटील, रोहीदास पवार, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह गुन्हे शाखेची पथके व स्थानिक पोलिस ठाण्यांची पथके सहभागी झाली होती.

या कारवाईमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चार जिवंत काडतुसांसह 79 खराब काडतुसे जप्त केली. बेकायदा तलवार, कोयते बाळगल्यामुळे 29 जणांना अटक करुन त्यांच्याकडून दोन तलवारी, 21 कोयते जप्त करण्यात आले. भारती विद्यापीठ परिसरातील सराईत गुन्हेगार प्रथमेश चंद्रकांत कांबळे (वय 18, रा. कात्रज), मारहाण प्रकरणातील संशयित आरोपी जय विटकर, अनिल विटकर (रा. लाल चाळ, गोखलेनगर) यांनाही यावेळी अटक करण्यात आली. याबरोबरच वडकी गावातील शेखर अनिल मोडक (वय 27), पंकज अभिमन्यू रणवरे (वय 35, रा. रामकृष्ण अपार्टमेंट, बाणेर रस्ता) यांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुल, चार काडतुसे जप्त करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने चंदननगर येथील बेकायदा हुक्का पार्लरवर कारवाई करुन हुक्का पार्लरचा मालक सिद्धार्थ राजेश अष्टेकर (वय 25, रा. चंदननगर) यास अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Vishwakarma Yojana : सरकारी योजनेत व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण अन् स्वस्तात कर्ज मिळवण्याची संधी, कोणाला मिळेल लाभ? जाणून घ्या

Panchang 11 January 2026: आजच्या दिवशी सूर्यकवच स्तोत्राचे पठण आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

900 दरवाजे आणि 800 खिडक्या, आजपासून बिग बॉस घरात स्पर्धकांचा खेळ रंगणार, पंख असलेली कुलूप, लपलेल्या चाव्या आणि बरच काही

Youth Killed Accident : धक्कादायक! कोल्हापूरचे चार तरूण रत्नागिरीला फिरायला गेले अन्,झाला भीषण अपघात; एकजण जागीच ठार तर तीनजण गंभीर

Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला ३ हजार मिळणार की नाही? लाडकी बहिण योजनेवर अचानक ब्रेक? प्रकरण थेट निवडणूक आयोगात!

SCROLL FOR NEXT