मुरलीधर मोहोळ  murlidhar mohol facebook
पुणे

PM Oath ceremony : पुण्यासाठी भाजपचा मेगाप्लॅन! मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी? PMO मधून फोन...

पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यात कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती, पुणे छावणी, कसबा पेठ आणि शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये सद्य स्थितीत भाजपचे चार आमदार आहेत तर काँग्रेसचा एक आणि अजित पवार गटाचा एक आमदार आहे.

संतोष कानडे

Pune Lok sabha murlidhar mohol : पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. त्यांना शपथविधीसाठी फोन असल्याचं सांगितलं जातंय. 'साम टीव्ही'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच खासदारकी आहे, तरीही त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यामध्ये भाजपने मेगाप्लॅन केल्याचं दिसतंय. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते प्रचारासाठी उतरले होते. तरीही भाजपचा पराभव झाला होता आणि रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. येत्या निवडणुकीत कसलाही धोका असू नये, यासाठी भाजपने पुण्याला आणि पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रात केंद्रीय मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येतंय.

2024 पुणे लोकसभा

मुरलीधर मोहोळ- ५,८४,७२८ (भाजप)

रवींद्र धंगेकर- ४,६१६९० (काँग्रेस)

वसंत मोरे- ३२०१२ (वसंत)

विजयी उमेदवाराचे मताधिक्य- १,२३,०३८

पुण्यात कुणाचं पारडं जड होतं

पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यात कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती, पुणे छावणी, कसबा पेठ आणि शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये सद्य स्थितीत भाजपचे चार आमदार आहेत तर काँग्रेसचा एक आणि अजित पवार गटाचा एक आमदार आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रभावी ठरलेले मुद्दे...

  • संथ गतीने होणारा मेट्रोचा विस्तार

  • पुरंदरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ हवेतच आहे. निवडणुकांमध्ये केवळ चर्चा

  • शहरात अपुऱ्या पायाभूत सुविधा

  • पाणी पुरवठा, पर्यावरणाचा मुद्दा ऐरणीवर

  • मराठा, मुस्लिम, दलित, ओबीसी मतदारांची भूमिका ठरणार महत्त्वाची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT