पुणे

पुणेकरांनो मिळकतकर सवलतीचे उरले दोन दिवस

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे बहुतांशी व्यवहार थांबूनही मिळकतकर भरण्यासाठी मात्र पुणेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. गेल्या 58 दिवसांत पुणेकरांनी तब्बल 280 कोटी रुपयांचा कर भरला आहे. पुढच्या दोन दिवसांत कर जमा केल्यास कराच्या रकमेवर 5 ते 10 टक्के सवलत राहणार आहे. सवलतीची मुदत येत्या 31 मे रोजी  संपणार आहे. त्यामुळे मिळकतधारकांनी सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने शुक्रवारी पुन्हा केले आहे. 

दरम्यान, सवलतीचा फायदा घेता यावा, यासाठी सुटी असूनही शनिवारी, रविवारी (ता. ३० व ३१) कर भरता येणार आहे.  शहरातील 2 लाख 33 हजार मिळकतधारकांनी हा भर जमा केला असून, कराच्या 25 हजारापर्यंतच्या रकमेवर 10 आणि त्यापेक्षा अधिक रक्कमेवर ५ टक्के सवलत दिली जाते, असे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी स्पष्ट केले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या हद्दीत सुमारे 10 लाख 57 हजार निवासी, व्यावसायिक मिळकती आहेत.  त्यानुसार महापालिकेला सुमारे दोन हजारांहून अधिक कोटी रुपयांचे उत्पन्न गृहित धरले आहेत. त्यानुसार चालू आर्थिक वर्षातील पहिल्या दोन महिन्यांत 280 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. पुढच्या दोन दिवसांत आणखी 20 ते 25 कोटी रुपये जमा होतील, असा अंदाज आहे. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही मिळकतकरातून अपेक्षित उत्पन्न मिळाले आहे. ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या यावेळी मोठी आहे. त्याशिवाय विविध भागांत 27 नागरी सुविधा केंद्र सुरू केले आहेत. त्यात रोख, चेक स्वरुपात कर जमा केला जात आहे. मात्र, पुढचे दिवस सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत कर भरता येणार आहे. 
-विलास कानडे, विभागप्रमुख, मिळकतकर, महापालिका  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी आतुर ! अमेरिकेने इराणला पाठवला १५ कलमी शांतता प्रस्ताव, काय आहेत अटी ?

Chhatrapati Sambhajinagar: हॉटेल सहा हजार, सिलिंडर बाराशेच! हिशेब जुळेना ; पथके करतात तरी काय?

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

Chhatrapati Sambhajinagar:अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती शहरात; धार्मिक वातावरणाची निर्मिती

Chhatrapati Sambhajinagar: संलग्नीकरणाची शुल्कवाढ स्थगित; चार सदस्यीय समिती स्थापन, पुढील बैठकीत होणार निर्णय

SCROLL FOR NEXT