पुणे

पुणे महापालिका अर्थसंकल्प : सिमेंटच्या रस्त्यासाठी 120 कोटींची तरतूद 

सकाळवृत्तसेवा

पुणे  - शहरातील रस्ते विकसित करण्याऐवजी सोसायट्यांमधील गल्लीबोळांच्या कॉंक्रिटीकरणाचा धडाका या वर्षीही सुरू राहणार असल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले. नवीन रस्ते विकसित करण्यासाठी 64 कोटी तर, गल्लीबोळातील सिमेंटचे रस्ते करण्यासाठी 120 कोटींची तरतूद केली आहे. 

भूगर्भात पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होत आहे, तसेच शहरातील तापमानही वाढत आहे, अशी ओरड होत असतानाही याकडे दुर्लक्ष करून काही वर्षांपासून रस्त्यांचे कॉंक्रिटीकरणाचे फॅड महापालिकेत आले आहे. आतापर्यंत सुमारे 500 किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण झाले. नागरिकांचा विरोध असूनही कामांचा धडाका सुरू आहे. पुढील वर्षीतरी लोकप्रतिनिधी यातून बोध घेऊन ही कामे कमी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, शहरात नवीन रस्ते विकसित करण्याऐवजी आहे त्याच रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करून कोणाचे "हित' साधायचे आहे, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात सोसायट्यांच्या गल्लीबोळांमधील रस्त्यांचेही सिमेंट कॉंक्रिटीकरणासाठी कोट्यवधींची तरतूद केली.41 प्रभागांमधील 860 गल्लीबोळांमधील रस्ते सिमेंटचे होणार आहेत. त्यासाठी 120 कोटींचा निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित केल्याचे दिसून येते. 

शहरातील रस्ते नव्याने विकसित करणे, अस्तित्वातील रस्त्यांची रुंदी वाढविणे, पादचारी उड्डाण पूल उभारण्यासाठी 248 कोटी 41 लाख 60 हजार रुपयांची भरीव तरतूद केली आहे. प्रत्यक्षात ही तरतूद तपासल्यानंतर यातील सर्वाधिक निधी "एससीएमआरटी'साठी 184 कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत. हा रस्ता कागदावरच आहे. तो प्रत्यक्षात येण्यासाठी अजूनही काही वर्षे लागणार आहेत; पण त्याऐवजी नवे रस्ते विकसित करण्यासाठी जेमतेम 64 कोटींची तरतूद केली आहे. 

फलकांसाठी साडेचार कोटी 
शहरातील चौकांची सुधारणा करण्यासाठी 66 कोटी 71 रुपयांची तरतूद आहे. त्यापैकी एकट्या साडेचार कोटींची तरतूद विविध प्रभागांमध्ये दिशादर्शक फलक, नामफलक उभारण्यासाठी केली आहे. या निमित्ताने नगरसेवकांना स्वतःचे नाव झळकवण्याची नामी संधी मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT