PMC Budget 2021-22 PMC Will buy five hundred electric buses 
पुणे

PMC Budget 2021-22 : ​पाचशे इलेक्ट्रीक बस खरेदी करणार

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणेकरांना सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविण्याच्या उद्देशाने नव्याने ५०० इलेक्ट्रीक बस खरेदी करून त्या पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) देण्यात येणार आहेत. त्याचवेळी विविध भागांतील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी नव्याने चार उड्डाणपूल, मुळा-मुठा नद्यांवर दोन ठिकाणी पुलांची उभारणीही केली जाणार आहे. वाहतुकीबाबतच्या जागृतीसाठी येरवड्यात ट्रॉफिक पार्क नियोजित केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारून तिची व्याप्ती वाढविण्यावरही महापालिकेच्या अंदाजपत्रकात भर देण्यात आला आहे. त्यानुसार नव्याने ५०० बस खरेदी, त्यासाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. या योजनेसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

पुढील वर्षभरात नव्याने ३० किलोमीटर रस्त्यांची बांधणी करण्यात येणार असून, विविध भागांत ५६ रस्ते तयार केले जाणार आहेत. ही कामे खासगीकरणातून (पीपीपी मॉडेल) करण्याचे नियोजन आहे. विकास आराखड्यातील (डीपी) रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही होणार आहे.

Video: पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं

विश्रांतवाडी, कल्याणीनगर ते कोरेगाव पार्क, खराडी, सिंहगड रस्त्यावर उड्‌डाणपूल उभारण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्याशिवाय वाहनतळे, भुयारी मार्गही केले जातील. बोपोडी-सांगवी मुळा नदीवर पुलाचे काम सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद आहे. सायकल योजनेलाही प्रोत्साहन देत, दरवर्षी किमान १० किलोमीटर लांबीच्या सायकल मार्गांची बांधणी करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT