national_war_memorial_Pune 
पुणे

'नॅशनल वॉर मेमोरिअल'चं नूतनीकरण होणार? महापालिका आयुक्तांचा स्थायी समितीकडे प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

पुणे : घोरपडी येथील 'नॅशनल वॉर मेमोरिअल' ची दुरुस्ती आणि परमवीर चक्र मिळविलेल्या जवानांचे अर्ध पुतळे बसविण्यासाठीचा तीस लाख रुपयांपर्यंतचा खर्च महापालिकेने करण्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवला आहे. 

पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत असलेल्या मोरवाडा जंक्‍शन जवळ लष्कराच्या वतीने 'नॅशनल वॉर मेमोरिअल' उभारण्यात आले आहे. या ठिकाणी लष्करातील शहीद सैनिक व अधिकारी यांचे स्मृतिस्तंभ आहेत. याच परिसरात संरक्षक विषयक म्युझियम, वॉर मेमोरिअल, रणगाडे, युद्धामध्ये वापरलेली आयुधेही ठेवण्यात आली आहेत. 2006 मध्ये नॅशनल वॉर मेमोरियलचा पर्यटन स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. पीएमपीएमएलच्या पुणे दर्शन अंतर्गत या वॉर मेमोरिअलला पर्यटक भेट देत असतात. 

सध्या सदर्न कमांडच्या वतीने या नॅशनल वॉर मेमोरिअलच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी फायबर मटेरिअल वापरून परमवीर चक्र मिळविलेल्या लष्करी अधिकाऱ्यांचे अर्ध पुतळे, आरसीसी पिलर व वॉल तसेच लायटिंग, साउंड सिस्टिम व अन्य सुशोभीकरणाच्या कामांचे नियोजन आहे. या सर्व कामांसाठी तीस लाख रुपये खर्च अपेक्षित असून महापालिकेने यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सदर्न कमांडच्या वतीने महापालिका आयुक्तांना करण्यात आले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT