पुणे

ताटातल्या चपात्या अन भाजीही गायब; महापालिकेच्या विलगीकरण कक्षातील प्रकार 

ज्ञानेश सावंत - सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाचे रुग्ण बरे व्हावेत, म्हणून डॉक्‍टरांची फौज दिवस-रात्र झटत आहे. त्याचवेळी महापालिकेच्या विलगीकरण कक्षातील नागरिक अन संशयितांच्या जेवणातून पोळ्या-चपात्या अन भाज्या मात्र गायब होत आहेत. या नागरिकांना रोजच्या जेवणात चारऐवजी दोन-तीनच चपात्या मिळत असून काही जणांच्या ताटात अपुऱ्या भाज्या आणि तेवढाच डाळ-भात दिला जातो. त्यामुळे त्यांना पोटभर जेवण मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तरीही, जेवणाचा ठेका दिलेल्या मंडळींना महापालिका पुरेसे पैसे मोजत आहे. 

कोथरूड येथील जय भवानीनगरमधील विलगीकरण कक्षातील रुग्णांना मंगळवारी तीनच चपात्या मिळाल्या. त्याचप्रमाणे बाणेरमधील कक्षात सोमवार रात्रीच्या जेवणात दोनच चपात्या होत्या. चपात्यांबरोबरच अधून-मधून भाज्याही अपुऱ्या मिळत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे या कक्षातील डॉक्‍टरांनाही अपुरे जेवण मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. कोंढवा, येवलेवाडी, हडपसर, सिंहगड रस्ता, वडगावमधील कक्षातील नागरिकांचेही अनुभव फारसे वेगळे नाहीत. केवळ जेवणाच्याच तक्रारी आहेत, असे नाही तर सकाळचा नाश्‍ता आणि चहाही वेळेत आणि चांगला मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विलगीकरण कक्षात जेवणाच्या व्यवस्थेसाठी केटरर्सची नेमणूक केली आहे. पहिल्या टप्प्यात निविदा न काढताच ही कामे दिली गेली. त्यामुळे अनेकांनी अपुरे, खराब आणि अवेळी जेवण पुरविल्याचे उघड झाले होते. अशा ठेकेदारांना बाजूला करीत महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी नवे ठेकेदार नेमले. त्यानंतर जेवणाचा दर्जा चांगला असला तरी जेवण कमी देण्याचा प्रकार घडत आहेत. 

असे आहे रोजचे जेवण 
- चार चपात्या 
- दोन भाज्या 
- डाळ-भात (मसाले भात, खिचडी) 
- लहान मुलांसाठी दूध, बिस्किटे, मिनरल वॉटर 

नाश्‍ता, चहा आणि दोनवेळचे जेवण ः 205 रुपये 

विलगीकरण कक्षातील क्षमता ः 
5 हजार 618 

दाखल नागरिकांची संख्या ः 
1 हजार 464 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विलगीकरण कक्षात पुरविलेल्या जेवणातील पदार्थ आणि दर्जा तपासण्यात येतो. नागरिकांना पूरक जेवण देण्याची ताकीद दिली आहे. याआधी त्याकडे दुर्लक्ष केलेल्या ठेकेदारांची कामे काढली आहेत. 
- राजेंद्र मुठे, उपायुक्त, पुणे महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT