PMCIssue 
पुणे

#PMCIssue डुकरांपासून सुटका कधी?

सकाळवृत्तसेवा

पौड रस्ता - महापालिकेने डुक्कर पकडण्यासाठी एजन्सीची नेमणूक केली असून, त्यावर ७५ लाखांचा निधी खर्च केला आहे. यामुळे तरी डुकरांच्या उपद्रवापासून मुक्तता होईन, अशी आशा कोथरूड परिसरातील नागरिकांना होती. मात्र डुकरांचा उपद्रव कायम आहे. यापासून नागरिकांची सुटका होणार कधी, असा सवाल लीलापार्क सोसायटीतील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

परिसरातील डुकरांच्या उपद्रवाबाबत सोसायटीतील रहिवासी विजया दामोदरे, मारोती माने, गोपाळ जोशी, श्रीकृष्ण परांजपे, अशोक पारनाईक, नीता पागे, नंदकुमार कुलकर्णी, नीलिमा गोखले, प्रमोद जाधव आदींनी महापालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केला. परंतु सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्ती व्यतिरिक्त प्रशासनाने कोणतीही कारवाई झाली दिसत नाही. यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

डुकरे पकडणारे परिसरातील सांडपाणी वाहिन्या तोडतात. याबाबत नगरसेवक रामचंद्र कदम यांच्याकडे तक्रार केल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांकडून त्यांची दुरुस्ती केली जाते. मात्र दोन-चार दिवसांनंतर परत कुठेतरी दुसरी वाहिनी तोडली जाते. यामुळे दुर्गंधीचा त्रास होत आहे. डुक्कर पाळणाऱ्यांची दहशत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले. सुतारदरा येथे नुकतीच ७० डुकरे पकडली आहे. मात्र डुकरांची संख्या जास्त असल्याने कारवाईनंतर परिणाम जाणवत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रहिवाशांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
लीलापार्क सोसायटीच्या मागे असलेल्या नाल्यातून जलवाहिनी गेली आहे. ही वाहिनी मलयुक्त पाण्यातून वाहत आहे. त्यामुळे या वाहिनीतून वाहणारे पाणी दूषित होण्याची शक्‍यता आहे. यामुळे प्रशासनाचे नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.

आम्ही २०१६पासून डुकरांचा त्रास सहन करत आहोत. डुकरे पाळणारे किश्‍किंधानगर नाल्यातून येणारी सांडपाणी वाहिनी तोडून चेंबरची झाकणे काढतात. त्यामुळे दुर्गंधीयुक्त मैलापाणी, कुजलेला कचऱ्यासह डुकरांचा उपद्रव नागरिकांना सहन करावा लागत आहे.
-विजया दामोदरे, चिटणीस, लीलापार्क सोसायटी

कोथरूड परिसरात डुकरे पकडण्यासाठी आगामी दिवसांमध्ये कारवाईचा विस्तार वाढविणार आहे. ‘बाॅम्बे ॲक्‍ट’प्रमाणे वराहपालकांवर गुन्हा दाखल करण्याचा विचार प्रशासन करत आहे.
- जयंत भोसेकर, सहायक आयुक्त, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT