PMC-Issue
PMC-Issue 
पुणे

#PmcIssue शहरात ३० ठिकाणी पादचारी पूल

मंगेश कोळपकर

पुणे - होर्डिंगचा सांगाडा कोसळून पाच जणांचा मृत्यू होण्याची दुर्घटना घडलेली असतानाच शहरात हडपसर, बाणेर, औंध, सिंहगड रस्ता, येरवडा, शिवाजीनगर आदी ३० ठिकाणी पादचारी पूल उभारण्याचे घाटत आहे. याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. या पुलांवर होर्डिंग्जद्वारे जाहिराती करून त्याद्वारे वर्षाला किमान पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचा दावा करण्यात येत असून, त्यात महापालिकेला गुंतवणूक करावी लागणार नाही, असेही सांगण्यात येत आहे. या पुलांसाठी किमान ८० ते १०० कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकते. 

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता येत नाही. त्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी हे पादचारी पूल उभारण्यात यावेत, असे त्यात म्हटले आहे. त्याचे प्राथमिक सादरीकरण महापालिकेच्या ‘बीओटी’ समितीपुढे झाले आहे. महापालिकेच्या आराखड्यानुसार पूल तयार करून त्याच्या दोन्ही बाजूला जाहिरातदारांनी जाहिरात करायची आहे. त्यामुळे पुलासाठी गुंतवणूक जाहिरात कंपन्यांना करावी लागेल. सुमारे २० वर्षे त्यांना जाहिरातींचे हक्क देण्यात येतील.  

महापालिकेने याबाबत वाहतूक पोलिसांचा अभिप्राय मागितला होता. परंतु, ठिकाणे निश्‍चित झाल्यावरच त्याबाबत वाहतूक पोलिस अभिप्राय देतील, असे पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी नमूद केले. या प्रस्तावासाठी महापालिकेत विविध विभागांच्या अभिप्रायांचेही संकलन सुरू आहे.

शहरात ३० ठिकाणी पादचारी पूल उभारण्याचा सुधारित प्रस्ताव पुढील आठवड्यात दाखल होईल. मेट्रो, बीआरटी, उड्डाण पूल आदींचा आढावा घेऊन पादचारी पूल नेमके कोठे उभारायचे, याबाबत पाहणी सुरू आहे. महापालिकेला कोणतीही गुंतवणूक न करता हे पूल उभारता येतील. 
- मुक्ता टिळक, महापौर

अस्तित्वातील पादचारी पुलांची दुर्दशा आहे. अनेक ठिकाणी लिफ्ट बंद आहेत. पूर्वीच्या पुलांचा वापरही केला जात नाही. तरीही ३० पुलांची भर कशाला? जाहिरातींच्या मलिद्यासाठी हा उद्योग दिसतो. त्यातून शहराचे विद्रूपीकरणच होणार आहे. गरवारे पुलाच्या भुयारी मार्गाचे मॉडेल राबविले का जात नाही? 
- हेमंत साठ्ये, सी-पीएमआरडीए समन्वयक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT