घोले रस्ता - अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे हैराण झालेल्या रेव्हेन्यू कॉलनीतील रहिवाशांनी रविवारी सकाळी महापौर बंगल्याच्या दारात ठिय्या आंदोलन केले. 
पुणे

#PMCIssue पाण्यासाठी नागरिक महापौरांच्या दारात

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणेकरांना सलग पाच तास पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची योजना सोमवारपासून अमलात येणार असतानाच गेली काही दिवस पाण्याअभावी हैराण झालेल्या शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी रविवारी सकाळी थेट महापौर बंगला गाठून त्याठिकाणी ठिय्या आंदोलन केले.

‘सणासुदीत तरी पाणी द्या,’ अशी मागणी करीत पाणी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका या वेळी महिलांनी घेतली. त्यानंतर परिसराला सायंकाळपासून पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

शिवाजीनगर पोलिस वसाहतीसह मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनीतील रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहेत. त्याबाबत रहिवाशांनी वारंवार तक्रारीही केल्या होत्या. तरीही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने रहिवाशांनी महापौर बंगल्याच्या दारात ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, शिरोळे, नगरसेविका जोत्स्ना एकबोटे, निलिमा खाडे आणि आयुक्‍त  सौरभ राव यांची बैठक झाली.

कमी दाबाने पाणी येत असल्याने १५ ते २० दिवसांपासून आमची धावपळ होत आहे. रोजच्या वेळापत्रकानुसारही पाणी मिळत नाही. वारंवार तक्रार करूनही पाणी मिळत नाही. 
- विजया धर्माधिकारी

महापालिकेला अनेक वेळा निवेदने दिली. मात्र, प्रशासनाकडून त्यांना केराची टोपली दाखविण्यात आली. ऐन सणासुदीत पाणी मिळत नसल्याने आम्ही काय करायचे?
- डॉ. सुकुमार सरदेशमुख

नगरसेवक, आमदार यांच्याकडे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मागणी केली आहे. पण, त्यांच्याकडून केवळ आम्हाला आश्‍वासने देण्यात आली आहे. 
-शुभदा कुलकर्णी

ज्या भागात पाणीपुरवठा सुरळीत नाही, तेथे पुरेसे पाणी पुरविण्यात येत आहे. रेव्हेन्यू कॉलनीतील रहिवाशांना कमी पाणी मिळते. आता त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.
- मुक्‍ता टिळक, महापाैर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT