pmt-bus sakal
पुणे

Pune : कात्रज-सिंहगड कॉलेज पीएमपीचा आदर्श मार्ग

साडेतीन किलोमीटरचे अंतर असलेला हा मार्ग पीएमपीचा आदर्श मार्ग ठरला असून या मार्गावर दैनंदिन सरासरी १८ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत आहे. तर, दररोज साधारणतः १८०० प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात.

सकाळ डिजिटल टीम

कात्रज - पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या बसमार्गांचे शक्यतो प्रतिकिमी मिळणाऱ्या उत्पन्नांपेक्षा होणारा खर्च हा खूप अधिक असतो. परंतु, पीएमपीच्या कात्रज आगारातील मार्गक्रमांक २१६-कात्रज-सिंहगड कॉलेज हा बसमार्ग याला अपवाद ठरला आहे. या मार्गावर प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून खर्चापेक्षा उत्पन्न अधिक आहे.

साडेतीन किलोमीटरचे अंतर असलेला हा मार्ग पीएमपीचा आदर्श मार्ग ठरला असून या मार्गावर दैनंदिन सरासरी १८ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत आहे. तर, दररोज साधारणतः १८०० प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात.

कात्रज आगारातील बसमार्गांवरील सरासरी प्रतिकिमी उत्पन्न हे ४५ रुपये आहे. तर प्रतिकिमी येणारा खर्च हा ९० रुपयांच्या घरात आहे. अशावेळी कात्रज-सिंहगड कॉलेजवरील बसमार्गांतून कात्रज आगाराला प्रतिकिमी ११० रुपये ६५ पैशांचे उत्पन्न मिळत आहे. या बसमार्गांव्यतिरिक्त सरासरी होणाऱ्या खर्चापेक्षा दुसरी कोणतीही बससेवा अधिक उत्पन्न मिळवून देत नाही. सरासरी उत्पन्नाच्या जवळपास अडीचपट उत्पन्न हा मार्ग मिळवून देत आहे.

या मार्गांवर दोन बसेसच्या माध्यमांतून दररोज साधरणतः २० खेपा होतात. प्रवासाचे एकूण चार टप्पे करण्यात आले असून तिकीटदर दहा रुपये ठेवण्यात आलेला आहे. मार्च महिन्यात या मार्गावर तिकिटविक्रीतून ५ लाख १९ हजार ७४५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असल्याची माहिती कात्रज आगार प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया

या मार्गावर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून तो आमचा आदर्श बसमार्ग आहे. या बसवर वाहक आणि चालक एकच असतात. त्यांच्याकडे एकप्रकारे बसचे पालकत्व देण्यात आलेले आहे. त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे भविष्यात आम्ही अशा प्रकारचे आदर्श बसमार्ग विकसित करण्याच्या प्रयत्नात आहोत.

- गोविंद हांडे, आगार प्रमुख, कात्रज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

Latest Marathi News Live Update : हवामान खात्याकडून रायगडला अवकाळी पावसाचा इशारा

तिथे जाऊन संसार... विदेशात सेटल व्हायला का तयार नाहीये उमेश कामत? प्रियाला म्हणाला- तुला जायचं असेल तर जा पण...

IPL सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, वार्षिक करारातून वगळ्यानंतर घेतला निर्णय; म्हणाला...

SCROLL FOR NEXT