PMC Pune decide to start 24 hours Vaccination Centre Frontline Workers
PMC Pune decide to start 24 hours Vaccination Centre Frontline Workers 
पुणे

पुण्यात फ्रंटलाइन वर्कर्ससाठी २४ तास लसीकरण; वाचा, कोणते आहेत 5 केंद्र?

सकाळवृत्तसेवा

पुणे : लसीकरण केंद्रांवर वाढत असलेली गर्दी व फ्रंटलाइन वर्कर्ससह इतर अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना दिवसा वेळ मिळत नसल्याने त्यांच्यासाठी २४ तास लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. सध्या पाच केंद्रांवर ही सुविधा असणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोनासाथीच्या नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्स, वैद्यकीय सेवांसह इतर अत्यावश्‍यक सेवांची जबाबदारी असणाऱ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वयाच्या पुढील सहव्याधी असलेल्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. सध्या पुण्यात शासकीय व खासगी अशी एकूण १०९ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत पुणे शहरात सुमारे पावणे तीन लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे.

शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरण केंद्राची संख्या मर्यादित आहे. कार्यालयीन कामकाजाच्या नियोजनामुळे महापालिका, पोलिस, आरोग्य विभाग यासह इतर शासकीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करताना अडथळे येत आहेत. तसेच लसीकरण केंद्रांवर पहाटे पासून लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांच्या रांगा लागत आहेत. ही गर्दी नियंत्रणात आणताना महापालिकेची दमछाक होत आहे. त्यामुळे फ्रंटलाइन वर्करच्या लसीकरणाचा फटका बसत आहे. त्यांचे लसीकरण गतीने व्हावे यासाठी रात्रीच्या शिफ्टमध्ये देखील लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली .

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


या ठिकाणी होणार लसीकरण
- राजीव गांधी रुग्णालय, येरवडा
- कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
- मगर रुग्णालय, हडपसर
- लायगुडे दवाखाना, सिंहगड रस्ता
- सुतार दवाखाना, कोथरूड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT