padmavati
padmavati 
पुणे

पुणे : आयुक्तांच्या पाहणीनंतर बीआरटीमधील चूक आली लक्षात (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सातारा रस्त्यावर पद्मावती चौकाजवळ बीआरटी मार्ग तयार करताना झालेली चूक महापालिकेने तब्बल दीड वर्षानंतर दुरुस्त करण्यास सोमवारी प्रारंभ केला. 

महापालिकेने बीआरटी मार्गात बस थांबा उभारल्यावर, त्या शेजारून बस जाऊ शकत नाही, असे लक्षात आले. त्या बाबतचे वृत्त 'सकाळ'ने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध केले होते. त्या नंतर पाठपुरावा ही केला होता. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 3 दिवसांपूर्वी या रस्त्याची पाहणी केली. त्या नंतर काल मध्यरात्री पद्मावती जवळील चौकात बीआरटी मार्ग पाडण्यास सुरवात झाली. मंगळवारी (ता. 4) देखील हे काम सुरू राहणार आहे, असे महापालिकेच्या पथ विभागाने स्पष्ट केले आहे.

सातारा रस्त्यावर डिसेंबर 20016 मध्ये बीआरटी मार्गाच्या फेररचनेस प्रारंभ झाला. 2 वर्षांत हे काम पूर्ण होईल, असे महापालिकेने त्या वेळी सांगितले होते. तेव्हा 80 कोटी रुपये खर्च झाले तर नंतर पुन्हा 30 कोटी रुपयांच्या निविदा महापालिकेने प्रसिद्ध केल्या आहेत. हे काम पूर्ण होण्यास आणखी 8 महिने लागतील, असे महापालिकेचा पथ विभाग आता सांगत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT