pmc staff union protests bjp mla nitesh rane uses foul language  esakal
पुणे

Pune News : जशास तसे उत्तर देऊ, पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा नीतेश राणेंना इशारा

पुणे महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांची चुकीच्या वक्तव्याबद्दल निषेध सभा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे महापालिकेवर काढलेल्या मोर्चात आमदार नीतेश राणे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार व शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याबद्दल वक्तव्य केले. त्याविरोधात मंगळवारी (ता. ५) महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले. त्यांनी महापालिकेत निषेध सभा घेतली.

चुकीच्या पद्धतीने टीका केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. पुण्येश्‍वर मंदिराच्या ठिकाणी अतिक्रमण केल्याचा आरोप करत सोमवारी (ता. ४) हिंदुत्ववादी संघटनांनी महापालिकेवर मोर्चा काढला.

हे अतिक्रमण होत असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने राणे यांनी अधिकाऱ्यांवर शेरेबाजी केली. त्यांच्या निषेधार्थ मंगळवारी शहर अभियंता वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यामध्ये आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार, उपायुक्त सचिन इथापे, विद्युत विभागप्रमुख श्रीनिवास कंदूल, पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, उपायुक्त माधव जगताप, चेतना केरूरे, प्रतिभा पाटील, संदीप कदम, उपायुक्त किशोरी शिंदे, जयंत भोसेकर, संतोष वारुळे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.

प्रशासनातील अधिकारी हे शहराच्या हितासाठी काम करत आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रयत्नशील असतात. महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात, त्यावेळी बाहेरचे आमदार आमच्या मदतीला येत नाहीत.

महापालिकेवर काढलेल्या मोर्चात अधिकाऱ्यांबद्दल चुकीच्या भाषेत वक्तव्य करणे योग्य नाही. आमच्या चुका असतील, तर आम्ही सुधारू. पातळी सोडल्यास शांत बसणार नाहीत. जशास तसे उत्तर देऊ, आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला.

महापालिकेसमोर झालेल्या आंदोलनात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार नीतेश राणे आणि महेश लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काही संघटनांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली. या वेळी शिष्टमंडळात विविध संघटनांचे ६० प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Frame Movie Review : माणुसकी की कॅमेऱ्याची लेन्स? नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांच्या हटके भूमिकेनं वेधलं लक्ष; वाचा 'फ्रेम' चित्रपटाचा रिव्ह्यू

Pune: जुन्नरच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची नवी पहाट; सुराळे शाळेत आधुनिक संगणक कक्ष सुरू

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक ऑडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT