pmc took fine of Rs 10,000 for breaking the rules form Reliance Mart  Ashok Gavane
पुणे

रिलायंस मार्टला महापालिकेचा दणका; नियम मोडल्याप्रकरणी १० हजारांचा दंड

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

अशोक गव्हाणे

कात्रज : कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या कात्रज -कोंढवा रस्त्यावरील खडी मशीन चौकातील रिलायन्स मार्ट १० हजारांचा दंड करण्यात आला. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्याप्रकरणी आणि कोरोनामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

रिलायन्स मार्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच या गर्दीवर मार्ट व्यवस्थापनाचे कोणतेही नियंत्रण ठेवले जात नव्हते. त्यानंतर कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. ज्‍योती धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख आरोग्य निरीक्षक ए. पी. मंन्र्दुपकर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, आरोग्य निरीक्षक अभिजीत सुर्यवंशी, सचिन बिबवे, दया तेलंगे यांनी ही कारवाई केली.

रिलायंस मार्टला या प्रकरणी समजपत्रही देण्यात आले असून पुढे आणखी नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मंगलदास माने यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT