commissioner vikram kumar Sakal
पुणे

Vikram Kumar: पुण्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बदली; 'हे' असणार नवे आयुक्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा बदल झाल्यानं त्याची चर्चा सुरु झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आयएएस अधिकारी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा बदल झाल्यानं त्याची चर्चा सुरु झाली आहे. (pmc vikram kumar transfered and ias rajendra bhosale will be taken charged as his place)

विक्रम कुमार यांची मुंबई एमएमआरडी विभागात बदली करण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुका अद्याप प्रलंबित असल्यानं गेल्या दोन वर्षांपासून विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून भूमिका बजावत होते. महापालिका आयुक्त आणि प्रशासक म्हणून विक्रम कुमार हे गेल्या पावणेचार वर्षांपासून पुणे महापालिकेचं कामकाज पाहिलं. या काळात पालिकेत नगरसेवक नसल्यानं त्यांनी कुठलेही धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत. आता त्यांच्या जागी राजेंद्र भोसले हे प्रशासकाची भूमिका बजावणार आहेत. त्यांना नागरी प्रशासन हाताळण्याची चांगला अनुभव आहे. (Latest Marathi News)

या दोन अधिकाऱ्यांबरोबरच आएएस अधिकारी लहू माळी यांची देखील बदली करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्रालयातील मदत आणि पुनर्वसन विभागात ते काम करणार आहेत.

तसेच मुंबईतील कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणारे आयएएस अधिकारी कैलाश पगारे यांची नवी मुंबईच्या एकात्मिक आदिवासी विकास योजना विभागात आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT