पुणे

महापालिकेची सौर ऊर्जा 3.62 रुपये दराने खरेदी करणार 

सकाळवृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या मालकीच्या विविध इमारतींवर उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पातून प्रतियुनिट 3 रुपये 62 पैसे दराने वीजखरेदी केली जाणार आहे. या प्रकल्पांमुळे महापालिकेची दरवर्षी सुमारे 19 लाख रुपयांची बचत होणार आहे. 

महापालिकेच्या बालगंधर्व रंग मंदिर, घोले रोड आर्ट गॅलरी, नायडू रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय या मिळकतींच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभे केला जाणार आहे. या प्रकल्पातून दरमहा सुमारे 26 हजार 460 युनिट इतकी वीजनिर्मिती होईल. यामुळे वीजबिलाच्या खर्चात बचत होणार आहे. हे प्रकल्प महाराष्ट्र रेस्को रुफ टॉप सोलर प्रा. लि. यांच्याकडून केला जाईल. हा प्रकल्प उभारणीचा खर्च संबंधित संस्था करणार असून, महापालिकेचा एक रुपया खर्च होणार नाही. केवळ छताच्या जागेचा वापर ती संस्था करणार आहे. त्यांच्याकडून ही वीजखरेदी करण्यासाठी करार करावा, प्रत्यक्ष वीजनिर्मितीनुसार प्रतियुनिट 3 रुपये 62 पैसे दराने वीजबिल देण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांना संपाचा फटका! पाण्याचे संकट कायम, जिल्हा प्रशासनासोबतची बैठक निष्फळ

Ajinkyatara Fort: शिवकालीन वैभवाने उजळणार ‘अजिंक्यतारा’; ११० कोटींच्या विकास आराखड्याने बदलणार रूप, सातारच्या गौरवशाली इतिहासाला नवी झळाळी

Vidarbha: समृद्धीवर ट्रॅव्हल्स ट्रकवर मागून धडकली; मेहकरजवळील घटना; १५ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी

Karad Highway: कऱ्हाडमध्ये पहिल्याच पावसात महामार्गाची पोलखोल; गटार तुंबले, पाणी-चिखल रस्त्यावर, गटारावरील तुटलेली झाकणेही जीवघेणी

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना धक्का! सलग 10 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ; 10 ग्रॅमचा नवा दर किती?

SCROLL FOR NEXT