पुणे

पुणे महापालिकेतील पदाधिकारी महिलेचा कोरोना रिपोर्ट समोर; रिपोर्टमध्ये...

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या वर्तुळाला प्रचंड घाबरविलेल्या पदाधिकारी महिलेच्या कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने महापालिकेतील पदाधिकारी-अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र संबंधित महिलेला किमान सात दिवस तरी घरीच विलग (क्वारंटाईन) व्हावे लागणार असल्याचे आरोग्य अधिकारी सांगत आहेत. पुढच्या आठवड्यात पुन्हा ‘स्वॅब’घेण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.

इतर आजाराच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या पदाधिकारी महिलेच्या पतीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, तपासणी अहवाल येण्याआधी संबंधित महिला कोरोनाला अटकाव करण्यासाठी सोमवारी बोलविलेल्या एका बैठकीला हजेर होत्या. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सर्व पदधिकारी, आयुक्त शेखर गायकवाड, अरिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थितीत होते. ही बैठक संपताच पदाधिकारी महिलेच्या पतीला कोरोना झाल्याचे पुढे आले. त्यामुळे पदाधिकारी-अधिकारी सगळीच प्रचंड घाबरले आणि या सगळ्या जणांना आता क्वारंटाईन करावेच लागण्याच्या शक्यतेने हालचाली सुरू झाल्या होत्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, तपासणीनंतर काही तासांत म्हणजे सोमवारी पदाधिकारी महिलेचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या ४८ तास धाकधूक राहिलेल्या पदाधिकारी -अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तरीही काही पदाधिकारी हे विलग राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिल्यांदा अहवाल निगेटिव्ह आला तरी, तो पुन्हा पॉझिटिव्ह येऊ शकतो. राज्यातील एका बड्या राजकीय नेत्यांचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे संबंधित महिलेला घरीच विलग राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तरी, या घटनेने चिंतेत पडलेले काही पदाधिकारीही स्वत:ला विलग ठेवणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, रुग्णांना घरातील व्यक्तीलाच विलग ठेक्यात येणार आहे. बैठकीला हजर असलेल्यांना विलग ठेवण्याची गरज नाही. मात्र, पुढच्या सात दिवसांनी पुन्हा एकदा तपासणी केली जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Weakening India : देशाच्या ७० ते ८० टक्के भागांत पावसाचे ढग दिसेनात; माॅन्सून कुठे गायब झाला ? हवामान विभागाची मोठी माहिती

Chhatrapati Sambhajinagar: पाच कोटी रोख, चार रायफल, दोन पिस्टल, सहा हजार काडतुसे! ; डाॅन बाबा फर्जनच्या घरात घबाड

Latest Marathi News Update : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून मार्गस्थ

Moshi Garbage Dump Accident : मेंदीचा रंग उतरण्याआधीच कुंकू पुसले; अक्षय सावंतच्या निधनाने पत्नीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अवघ्या दोन महिन्यांत संसाराची राखरांगोळी

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

SCROLL FOR NEXT