पुणे

#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन

सकाळवृत्तसेवा

फुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी ग्रामस्थांनी आज दुपारी गावातील व भेकराईनगर येथील महापालिकेच्या दोन्ही विभागीय क्षेत्रीय कार्यालयांना टाळे ठोकले.

फुरसुंगी गाव पालिकेत घेताना गावाला तातडीने पाणी व अन्य नागरी सुविधा दिल्या जातील, असे आश्वासन पालिकेने दिले होते. सुविधांच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या पालिकेबरोबर अनेक बैठका झाल्या मात्र आश्वासनानंतरही पाणी, आरोग्य, स्वच्छता आणि अन्य महत्त्वाच्या नागरी समस्या सुटत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी फुरसुंगी गावातील तसेच भेकराईनगर येथील पालिकेच्या विभागीय क्षेत्रीय कार्यालयाला ‘टाळे ठोको’ आंदोलन करत ही कार्यालये कुलूप लावून बंद करीत महापालिकेचा निषेध केला. अर्चना कामठे, दिनकर हरपळे, प्रवीण कामठे, रोहिणी राऊत, रणजित रासकर, राजाभाऊ सूर्यवंशी, विशाल हरपळे, उषा ढोरे, संजय हरपळे, किरण सरोदे आदींसह ग्रामस्थांनी आंदोलन केले.

ग्रामपंचायतच बरी होती
सध्या आम्हाला दहा ते पंधरा दिवसांनी एकदा पाणी मिळते. रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग पडले असून, अनारोग्याची स्थिती निर्माण झाली आहे. कचऱ्याच्या गाड्या रोज येत नाहीत, विहिरींवरील पाण्याच्या मोटारी बंद पडल्या, तर वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने मोठी पाणीटंचाई निर्माण होत आहे. अन्य नागरी सुविधा देण्याकडेही पालिका लक्ष देत नाही. गाव पालिकेत घेताना ग्रामपंचायतीचा जमा झालेला सुमारे चार कोटींचा महसूल पालिकेने त्यांच्याकडे घेतला. शिवाय वर्षभरात गावातून पालिकेने सुमारे सहा ते सात कोटी महसूलही जमा केला. तरीदेखील पालिका गावाला आवश्‍यक नागरी सुविधा देत नाही. पालिका अधिकारी येथील कामांकडे काणाडोळा करतात. ग्रामपंचायतीत असतानाची परिस्थिती बरी होती, असे म्हणायची वेळ पालिकेने आमच्यावर आणली असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Murlidhar Mohol : राजू शेट्टी नुरा कुस्ती खेळताहेत, धंगेकर बिळातील उंदीर; जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोपावर मोहोळ यांचं प्रत्युत्तर

"हा सिनेमा सिक्वेल नाही" पुन्हा शिवाजीराजे सिनेमाच्या वादावर महेश मांजरेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले..

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मनसे मेळाव्यासाठी राज ठाकरे दाखल

शेतकऱ्यांची दिवाळी गाेड! 'अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८४६ कोटींची मदत'; नेमकी किती जणांना मिळाली मदत?

साेलापूर हादरलं! 'डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून युवकाचा निर्घृण खून'; गरिबी हटाव झोपडपट्टी क्र. एकमधील घटना..

SCROLL FOR NEXT