pmc sakal
पुणे

महापालिकेचा उपअभियंता 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

शाळा दुरूस्तीच्या कामाचे बील काढण्यासाठी केली 50 हजार रुपयांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील लाचखोरीचे प्रकरण गाजत असतानाच सोमवारी पुणे महापालिकेच्या उपअभियंताही 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. महापालिकेच्या शाळा दुरूस्तीचे बिल काढण्यासाठी अधिकाऱ्याने लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. (Pune News)

सुधीर विठ्ठलराव सोनवणे (वय 51) असे उपअभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी 2018-19 या कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या शाळा दुरूस्तीचे काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे मिळावेत, यासाठी त्यांनी उपअभियंता या पदावर कार्यरत असणाऱ्या सोनवणे यांच्याकडे अर्ज केला होता.

त्यासाठी त्यांनी सोनवणे यांची भेटही घेतली होती. मात्र सोनवणे यांनी संबंधीत कामाचे बील मंजुर करण्यासाठी आणि दुसऱ्या कामाचे बील काढून दिल्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यांच्यामध्ये झालेल्या तडजोडीनंतर 40 हजार रुपये देण्याचे निश्‍चित झाले होते.

दरम्यान, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांनी संबंधीत प्रकरणाची पडताळणीही केली. सोमवारी दुपारी महापालिकेच्या पार्कींग परिसरामध्ये सोनवणे यास तक्रारदाराकडून 40 हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोनावणे यास ताब्यात घेतले. पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अतिरीक्त पोलिस अधिक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने हि कारवाई केली. पोलिस निरीक्षक भारत साळुंखे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT