पुणे - शहर (Pune City) आणि पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) पहिल्या टप्प्यात धावणाऱ्या मेट्रोच्या (Metro) डब्यांत प्रवाशांना (Passenger) पोचता यावे, यासाठी पीएमपीच्या ३०० मिडी बस (Midi Bus) फिडर रूटवर (Fidder Route) धावणार आहेत. मेट्रोच्या प्रत्येक स्थानकापासून नजीकच्या ५ किलोमीटरपर्यंत पीएमपीची (PMP) मेट्रोसाठी पूरक सेवा राहणार आहे. मेट्रो आणि पीएमपी यांच्या संयुक्त नियोजनातून फिडर रूटचा हा आराखडा तयार झाला आहे. (PMP 300 Midi Bus Running on Metro Fidder Route)
वनाज- रामवाडी आणि पिंपरी- स्वारगेट या मार्गावर मेट्रो धावणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ किलोमीटर मेट्रोचे काम पूर्ण होणार आहे. त्यातंर्गत पिंपरी - फुगेवाडी आणि वनाज- गरवारे महाविद्याल दरम्यान मेट्रो धावेल. त्यासाठी पिंपरीतील संत तुकारामनगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, वनाज, आऩंदनगर, गरवारे महाविद्यालय ही स्थानके आहेत. त्यासाठीही फिडर बसचे नियोजन पूर्ण झाले आहे. दोन्ही शहरांत मेट्रोची एकूण ३० स्थानके असतील. त्यासाठी वर्तुळाकार १५६ किलोमीटरचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी ३०० बस तर, मेट्रोचे विस्तारीत मार्ग तयार झाल्यावर सुमारे ४०० बसची गरज लागेल.
ट्रान्स्फर स्टेशनसाठी बस
कासारवाडी, डेक्कन, महापालिका भवन, रामवाडी येथे मेट्रोची ट्रान्स्फर स्टेशन्स असतील. त्या ठिकाणी पुरेशा संख्येने बस उपलब्ध करण्यात येतील. तसेच डेक्कन स्थानकातून प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी पादचारी रस्ता तयार करण्याची सूचना पीएमपीने मेट्रोला केली आहे. तसेच रामवाडी स्थानक पुणे विमानतळापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आहे. त्यासाठीही फिडर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळ ते मेट्रो स्थानकादरम्यान पीएमपीची शटल बससेवा सुरू होईल.
प्रवाशांना मिळणार या सुविधा
- मेट्रो मार्ग आणि पीएमपीचे मार्ग यांची एकत्रित माहिती बस आणि मेट्रोतील डिस्प्ले बोर्डवर मिळणार
- पीएमपी प्रवास आणि मेट्रोचा प्रवास, यासाठी एकाच कार्डद्वारे भाडे आकारणी
- पीएमपी आणि मेट्रोचे वेळापत्रक, स्थानके, थांबे आदींची माहिती देणारे संयुक्त ॲप
- पीएमपीच्या फिडर बससेवेचे वेळापत्रक मेट्रोत डिस्प्ले होणार
राजेंद्र जगताप (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी) - पीएमपी आणि मेट्रो या सार्वजनिक वाहतूक सेवा आहेत. दोन्ही परस्परांशी स्पर्धा न करता एकमेकांना पूरक भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना घरातून कामाच्या ठिकाणी सहजपणे पोचता येईल. त्यातून खासगी वाहनांची संख्या कमी होऊन प्रदूषण नियंत्रित होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.