PMP Bus
PMP Bus 
पुणे

पीएमपीच्या उत्पन्नाची उच्चांकी भरारी

सकाळ वृत्तसेवा

एकाच दिवसात १ कोटी ९० लाख रुपये; १ हजार ६५० गाड्या मार्गांवर
पुणे - एकाच दिवसात सुमारे १ कोटी ९० लाख रुपये उत्पन्न पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) तिजोरीत सोमवारी दाखल झाले. या दिवशी पीएमपीच्या सुमारे १ हजार ६५० गाड्या मार्गांवर होत्या आणि प्रवाशांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. मागील पाच वर्षांत एकाच दिवसात हे सर्वाधिक उत्पन्न आहे. 

पीएमपीचे प्रतिदिन सरासरी उत्पन्न एक कोटी ४० लाख ते १ कोटी ६० लाख रुपयांदरम्यान आहे. मात्र, पीएमपीने सोमवारी तब्बल १ कोटी ९० लाख रुपयांच्या उत्पन्नाला गवसणी घातली. पीएमपीचे चालक, वाहक आणि प्रशासन यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे, असे पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर आणि वाहतूक विभागाचे व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले. 

वाघमारे म्हणाले, की पीएमपीच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीकर परदेशी असताना ६ जानेवारी २०१५ रोजी तब्बल २ कोटी ५ लाख रुपयांचे उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत आले होते. पीएमपीच्या ताफ्यात दोनशे मिडी, १२५ ई-बस आल्या आहेत; तसेच सीएनजीवरील ४०० बसही येण्यास प्रारंभ झाला आहे. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातून उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट गाठता आले. यापुढील काळात रोजचे उत्पन्न सरासरी दोन कोटी रुपये राहील, यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असेल. 

आगार प्रमुखांचेही सहकार्य ! 
पीएमपीच्या १३ आगारांत त्यांच्या बस वेळेवर आणि सुस्थितीत धावतील, यासाठी विविध सूचना देण्यात आल्या आहेत; तसेच तपासणी पथकेही कार्यान्वित करण्यात आली आहेत. आगारप्रमुखांकडून सुरू असलेल्या या उपायांमुळे कामकाजात सुसूत्रता निर्माण होत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT