Bus
Bus 
पुणे

पीएमपीच्या नव्या मार्गांना प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

पुणे - गर्दीच्या वेळी ११ मार्गांवर पीएमपीने सुरू केलेल्या जादा बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नव्या मार्गांवर बस वाहतूक सुरू झाली आहे. 

या बस सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या गर्दीच्या वेळी धावत आहेत. या मार्गांवर प्रत्येकी चार ते पाच बसचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवासी संख्या कमी असलेले आणि आर्थिक उत्पन्न घटलेले काही मार्ग बंद करून नवे मार्ग सुरू करण्यात आले आहेत. या मार्गांवर वाहतूक कोंडी कमी असल्याने वेळापत्रकानुसार बस धावत आहेत.

कमी अंतराचे मार्ग असल्याने तुलनेने जुन्या बस वापरणे शक्‍य आहे, तसेच दुपारी या बस उभ्या असल्याने बसची देखभाल -दुरुस्ती होत आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. 

सर्व मार्गांवर मिळून ५० वाहक व ५० चालकांची बचत झाली आहे. नव्याने सुरू झालेल्या मार्गांसाठी ई-तिकिटिंगमध्ये काही प्रमाणत बदल करण्यात आला आहे.

नवे मार्ग पुढीलप्रमाणे 
  स्वारगेट    कात्रज 
  स्वारगेट    अप्पर
  स्वारगेट    हडपसर
  स्वारगेट    धायरी
  डेक्कन    माळवाडी
  डेक्कन    कोथरूड डेपो
  पुणे स्टेशन    हडपसर
  पुणे स्टेशन    वाघोली
  पुणे स्टेशन    विश्रांतवाडी
  अप्पा बळवंत चौक          सांगवी
  मनपा    बालेवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT