पुणे

सातारा रस्त्यावरील वाहतुकीत बदल

CD

पुणे, ता. १४ : स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गावरील पीएमपीच्या बस वाहतुकीत आणि थांब्यांच्या रचनेत मेट्रोच्या कामांमुळे बदल केला आहे, त्याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.
स्वारगेट ते कात्रजदरम्यान भुयारी मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. ती दूर करून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीने बससेवेच्या मार्गात तात्पुरते बदल केले आहेत. तसेच यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस नॉन बीआरटी बस थांब्यांची व्यवस्था केली आहे, असे पीएमपी प्रशासनाने नमूद केले आहे.

असा आहे बदल...
- पंचमी हॉटेल व भापकर पंप परिसर :
स्वारगेटकडून कात्रजकडे जाताना तसेच कात्रजकडून स्वारगेटकडे येताना बस वाहतूक मुख्य मार्गातून होईल

- अरण्येश्वर कॉर्नर व नातूबाग परिसर :
स्वारगेटकडून जाताना तसेच कात्रजकडून येताना बस वाहतूक सेवा रस्त्यावरून होईल

- पद्मावती, के. के. मार्केट, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, कात्रज प्राणिसंग्रहालय व मोरे बाग परिसर :
स्वारगेटकडून कात्रजकडे जाताना बस वाहतूक बीआरटी मार्गातून होईल तसेच कात्रजकडून स्वारगेटकडे येताना बस वाहतूक सेवा रस्त्यावरून होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ‘नाना’ पर्वाचा अंत! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; साश्रू नयनांनी लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप

Dr. Neelam Gorhe : १२ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळग्रस्त गावांत चारा पोहोचवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रशासनाला सूचना

FDA Crime : विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील भोजनगृह बंद; ‘एफडीए’ची धडक कारवाई

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान - रामदास आठवले

Nana Patekar : अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाची धावपळ; डोणजे येथील ‘नानावाडी’ फार्म हाऊस परिसरात अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT