Bus
Bus 
पुणे

पीएमपीकडून यंदा ३१ शाळांसाठी ५३ बस

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी स्कूल बस शोधणे हा पालकांपुढे प्रश्‍न असतो. शहरात खासगी स्कूल बस आणि पीएमपीच्या स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण सुरू असते. या वर्षी पीएमपीकडून शहरातील ३१ शाळांसाठी ५३ बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आता सुरू होत आहेत. घर ते शाळा आणि शाळा ते घर विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी खासगी वाहनांबरोबर पीएमपीच्या बसचाही वापर केला जातो. या वर्षी पीएमपीकडून विद्यार्थी प्रवासासाठी ५३ बस उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती पीएमपीएमएल प्रशासनाकडून देण्यात आली. पीएमपीकडे सुमारे दोन हजार बस आहेत.

रोजच्या प्रवासी वाहतुकीसोबत पुणे दर्शन, पुष्पक, निवडणूक कामकाज, सण-उत्सव यासाठी जादा गाड्या यासाठी या बसचा वापर होत असतो. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठीदेखील पीएमपी बसचा वापर करण्यात येतो. 

गेल्या वर्षी ५२ बस शालेय वाहतुकीसाठी पीएमपी प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या होत्या. या वर्षी पीएमपी प्रशासनाने ५३ बस उपलब्ध करून दिल्या आहेत. या बस शहरातील ३१ शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूक करणार आहेत. यात महापालिकेच्या १८ शाळा असून, १३ खासगी शाळांचा समावेश आहे. या बसची ‘फिटनेस’ तपासणी करण्यात आली असून, या बस शाळा सुरू झाल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू करतील, असे पीएमपी प्रशासनाकडून  सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT