PMP-Pune 
पुणे

दिलासादायक : पुण्यात आता पीएमपी बससेवा सुरू होणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ दरम्यान बससेवा सुरू करावी, असा प्रस्ताव महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना सादर करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्र आणि शहराचा मध्य भाग सोडून उर्वरित शहरात सुमारे २० मार्गांवर ९५ बसच्या माध्यमातून बससेवा सुरू करता येईल, असे त्यात म्हटले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात एक जूनपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता आली आहे. दुकाने, उद्याने काही प्रमाणात सुरू झाली आहेत. विमान आणि रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही पूर्ववत होत आहे. 

रिक्षा आणि कॅबलाही काही प्रमाणात वाहतूक सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. खासगी आणि शासकीय कार्यालयेही सुरू झाली आहेत. त्यामुळे शहरात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. सध्या खासगी वाहनांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्या नागरिकांकडे खासगी वाहने नाहीत, विशेषतः कष्टकऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यांना कामावर जाण्यासही अडचण येऊ लागली आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र आणि मध्य भागातील पेठांचा भाग सोडून पीएमपीची सेवा ठराविक वेळेत सुरू करावी, असा प्रस्ताव पीएमपीचे संचालक आणि नगरसेवक शंकर पवार यांनी दिला आहे.

शहरातील प्रमुख रस्ते, उपनगरे येथे पीएमपीची शटल सेवा सुरू करता येईल. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्यात येऊ शकेल. बसमध्ये 
सध्या त्यासाठी मार्किंग करण्यात आले आहे, असेही त्यात नमूद केले आहे. 

शहरातील बससेवा सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना तर, पुणे आणि पिंपरी चिंचवड अशी बससेवा सुरू करण्यासाठी पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना प्रस्ताव दिला आहे. शहरातील सर्वच वाहतूक सुरू झालेली असताना, पीएमपी बंद ठेवणे योग्य नाही. ज्यांच्याकडे स्वतःची वाहने नाहीत, अशा नागरिकांची गैरसोय होत आहे.
- शंकर पवार, संचालक, पीएमपी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT