PMP-Bus 
पुणे

पीएमपीच्या बस आता मिळणार भाडेतत्त्वावर

सकाळवृत्तसेवा

पुणे - लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पीएमपीने बस भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी कंपन्यांना या बस उपलब्ध होणार आहेत. 

देशात २४ मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. तेव्हापासून पीएमपीची शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये बससेवा बंद आहे. या दोन्ही शहरांत सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक पीएमपीकडून सुरू आहे. त्यासाठी सुमारे १२० बस रोज धावतात. सुमारे १४०० बस सध्या विविध आगारांत उभ्या आहेत. 

चाकण, हिंजवडी, भोसरी, चिंचवड, रांजणगाव आदी ठिकाणी अनेक कंपन्या सुरू आहेत. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वाहतूकीसाठी या बस वापरता येतील, असे आवाहन पीएमपीने केले आहे. या कंपन्यांना दरमहा करारानुसार बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी ८३ रुपये ५० पैसे प्रती किलोमीटर दराने आकारणी होणार आहे. दरमहा किमान दोन हजार किलोमीटरचे पैसे संबंधित कंपनीकडून आकारले जाणार आहेत.  ज्या कंपन्यांना बस हव्या आहेत, त्यांनी माहितीसाठी  ०२० - २४५०३३००  किंवा ९८८१४९५५८२  या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''अजित पवारांचं विमान जमिनीला टच होण्याआधीच स्फोट? विमानात बॉम्ब...'', खासदाराने उपस्थित केले प्रश्न

RBI Monetary Policy : किसान क्रेडिट कार्डबाबत RBI चा महत्त्वाचा निर्णय! शेती कर्ज होणार सोपे, जाणून घ्या अपडेट

Shukra Gochar 2026: शुक्र कुंभ राशीत प्रवेश करतोय! ‘या’ राशींचे बिघडलेले काम होणार पूर्ण, धन-प्रेमात लाभ

अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवणी; काँग्रेसच्या उमेदवाराचा केला पराभव; AIMIM च्या एका नगरसेवकाची भाजपला साथ

Navi Mumbai: नवी मुंबईत बिबट्याचा धुमाकूळ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT