pmp
pmp 
पुणे

पीएमपीचा बिझनेस प्लॅन तयार

सकाळ वृत्तसेवा

पुणे  शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा कशा देता येतील, पीएमपीच्या उत्पन्नाचे स्रोत कसे वाढविता येतील, बसच्या देखभाल-दुरुस्तीचे नियोजन डेपोनिहाय कसे करता येईल, मनुष्यबळाचा वापर योग्य पद्धतीने कसा करता येईल आदींबाबत मार्गदर्शक ठरेल असा पुढील पाच वर्षांसाठीचा "बिझनेस प्लॅन' पीएमपीने तयार केला आहे. महिनाभरात त्याचे संचालक मंडळाला सादरीकरण होणार. त्यानंतर लगेचच अंमलबजावणीला सुरवात होणार आहे.

पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्यासमोर बिझनेस प्लॅनचे सादरीकरण झाले. "अर्नेस्ट आणि यंग' (ई अँड वाय) या कंपनीने तो तयार केला आहे. पीएमपीने त्यात काही सुधारणा सुचविल्या आहेत. त्यानंतर महिनाभरात अंतिम आराखडा सादर करणार असल्याचे चारठणकर यांनी सांगितले.

महापालिका, स्मार्ट सिटी, मेट्रो, विमानतळ प्रशासन, एसटी महामंडळाशीही हा प्लॅन तयार करताना चर्चा केली आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांचा अंतर्भाव प्लॅनमध्ये केला आहे. तसेच संचालक मंडळाने मंजुरी दिल्यावर या आराखड्याची अंमलबजावणी करणार आहे. सुमारे दोनशे पानांचा हा प्लॅन आहे.

सुमारे 11 लाख प्रवाशांची रोज वाहतूक करणाऱ्या पीएमपीने बिझनेस प्लॅन तयार करावा, अशी मागणी अनेक स्वयंसेवी संस्था करीत होत्या. "परिसर' संस्थेने याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या योजनेतून महापालिकेने हा प्लॅन तयार करण्यासाठी आर्थिक साह्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT