PMP Sakal
पुणे

पीएमपीच्या वाहकांनी ई-तिकिटिंग मशिनबाबत केल्या तक्रारी

कोथरूड, स्वारगेट आणि न. ता. वाडी डेपोमध्ये पीएमपीकडून प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या ई-तिकिटिंग मशिनबाबत वाहकांनी तक्रारी केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मशिनमधून (Machine) तिकीट (Ticket) निघण्यास विलंब लागतो... निश्‍चित दरापेक्षा (Rate) कमी दराची तिकिटे बाहेर येतात... कोणत्याही प्रकारचे रिपोर्ट (Report) निघत नाही आणि एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर जाण्यासाठी पुन्हा डेपोमध्ये येऊन मशिन बदलण्यासाठी जावे लागते... या आहेत पीएमपीच्या (PMP) वाहकांनी ई-तिकिटिंग मशिनबाबत केलेल्या तक्रारी. (PMP Conductor E Ticketing Machine Complaint)

कोथरूड, स्वारगेट आणि न. ता. वाडी डेपोमध्ये पीएमपीकडून प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या ई-तिकिटिंग मशिनबाबत वाहकांनी तक्रारी केल्या आहेत. ‘ई-बिक्स्‌ कॅश’ आणि ‘टेकरिगल’ या दोन कंपन्यांच्या भागीदार कंपन्यांतून योजना राबविण्यात येत आहे. मे महिन्यांच्या सुरुवातीला या कंपनीला प्रायोगिक तत्त्वावर हे काम दिले आहे. एक महिना या कंपनीचे मशिन वापरल्यानंतर या तीनही डेपोतील कर्मचाऱ्यांनी मशिनबाबत पीएमपी प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. पीएमपीने चार वर्षांपूर्वी सेंट्रल बँक ऑफ इंडियाला हे काम दिले आहे. असे असताना या कंपनीला प्रायोगिक तत्त्वावर हे काम दिले आहे. त्यासाठी मान्यताही घेतली नाही.

कोरोनाच्या काळात कोणत्याही नवीन योजना राबवू नये, असा आदेश केंद्र आणि राज्य सरकारने दिला असतानाही पीएमपी प्रशासनाने स्वत:च्या अधिकारात कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता हे काम दिले आहे.

यासंदर्भात पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप म्हणाले, तीन डेपोमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या मशिन देण्यात आल्या आहेत. नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे वापरताना काय अडचणी येत आहेत, त्यांची माहिती घेण्यात येत आहे. त्यानुसार त्यामध्ये बदल करण्यात येतील.

नातेसंबंधांमुळे खटाटोप

‘ई-बिक्स्‌ कॅश’ ही मूळ अमेरिकन कंपनी आहे. तिच्याबरोबर भागीदार असलेल्या डेक्कन जिमखान्यावरील टेकरिगल ही कंपनी सहा महिन्यांपूर्वी स्थापन झाली आहे. या कंपनीचे मालक आणि पीएमपी प्रशासनातील एक अधिकारी यांचे नातेसंबंध असल्याची चर्चा पीएमपीमध्ये आहेत. त्यामुळे या कंपनीला काम मिळावे, यासाठी खटाटोप चालला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कोथरूड, स्वारगेट आणि न. ता. वाडी या तीन डेपोंचे काम प्रायोगिक तत्त्वावर या कंपनीला एक महिन्यापूर्वी दिले आहे. या तिन्ही डेपोतील गेल्या महिन्याभरात झालेल्या महसुलाचा ताळमेळच लागत नसल्याचे समोर आले आहे. त्याबाबत डेपोच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला पत्र पाठवून कळविले आहे.

अतिरिक्त खर्च करावा लागणार

संबंधित कंपनीने रेट कॅन्ट्रक्टचे जे प्रपोजल पीएमपीला दिले, त्यामध्ये सदर कंपनीने फक्त मशिन आणि त्यासाठी प्रत्येक डेपोसाठी एक इंजिनिअर देण्याची तयारी दर्शविली आहे. याउलट, सध्या ज्या बँकेकडे हे काम आहे, त्या बँकेने मशिन, त्यासाठी लागणार कर्मचारी वर्ग, संगणक, पेपर रोल, टोनर, प्रिंटर आदी साहित्य देऊ केले आहे. या सर्व सोयी-सुविधांपोटी बँकेला पर तिकीट २४ पैसे द्यावे लागतात. ई-बिक्स्‌ कॅश या कंपनीला पर मशिन दरमहा १८३५ रुपये भाडे द्यावे लागणार आहे. या व्यतिरिक्त कर्मचारी, प्रिंटर, संगणक, पेपर रोलसाठी स्वतंत्र पैसे मोजावे लागणार आहेत. त्यातून पीएमपीला किमान पाच वर्षांत २२ ते २३ कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT