पुणे

रात्रसेवेतून पीएमपीला हात

सकाळवृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सवादरम्यान शहरातील प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद असले, तरी रात्र बससेवेच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नामुळे आणि महापालिका हद्दीबाहेरून शहरात आलेल्या गणेशभक्तांमुळे पीएमपीला आधार मिळाला आहे. त्यामुळेच पीएमपीचे सरासरी उत्पन्न कायम राहिले. पीएमपीला रात्र सेवेतून सात दिवसांत ६० लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. 

शिवाजी रस्त्यावरून पीएमपी बसच्या दररोज १५०० ते २००० फेऱ्या होतात. मात्र, गणेशोत्सवात या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली होती.  परिणामी, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, सहकारनगर, पद्मावती, स्वारगेट, पिंपळे निलख, खडकी आदी  मार्गांवरील वाहतूक विस्कळित झाली होती. तसेच, मध्यभागातील अनेक रस्ते बंद होते; तर काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कष्टकऱ्यांचे हाल झाले. मात्र, नाशिक फाटा, तळेगाव दाभाडे, तळेगाव ढमढेरे, राजगुरुनगर, मावळ, घोटावडे, भूगाव, मुळशी, निगडी, सासवड आदी भागांतून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्यामुळे पीएमपीला चांगले उत्पन्न मिळाले.

रात्र बससेवा सुरळीत 
गणेशोत्सवात पीएमपीने १६ ते २३ सप्टेंबरदरम्यान रात्र बससेवा सुरू केली होती. रात्री अकरा ते पहाटे तीन-चार वाजेपर्यंत ती सुरू होती. त्यासाठी नेहमीच्या तिकिटापेक्षा प्रती प्रवासी पाच रुपये जादा दर आकारणी करण्यात आली. शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व स्थानकांवरून रात्र सेवा सुरू होती.

गणेशोत्सवादरम्यान शहरातील काही रस्त्यांवरील पीएमपीची वाहतूक विस्कळित झाली होती. काही मार्गांवर बस उशिरा धावत होत्या. सुदैवाने रात्र सेवेला प्रवाशांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. तसेच, उपनगरे आणि महापालिका हद्दीबाहेरील प्रवाशांची वाहतूक चांगली झाल्यामुळे उत्पन्नाची सरासरी गाठता आली. 
- विलास बांदल, महाव्यवस्थापक, पीएमपी

सरासरी गाठण्यात यश
पीएमपीचे एरवी सरासरी उत्पन्न एक कोटी ४५ लाख रुपये असते. त्यासाठी १४५० बस रस्त्यावर असतात. यंदा उत्सवादरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद होती. त्यामुळे पीएमपीचे उत्पन्न घटले होते. परंतु, रात्र सेवेमध्ये सात दिवसांत सुमारे ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे एक कोटी ४२ लाख रुपयांचे सरासरी उत्पन्न गाठण्यात पीएमपीला यश आले. उत्सवात सुमारे ७५ लाख रुपयांचे जादा उत्पन्न मिळेल, असे गृहीत धरले होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT