PMP Bus Sakal
पुणे

PMP Ratrani Bus : ‘पीएमपी’ची रातराणी आजपासून पुन्हा धावणार; २० रुपयांत प्रवास करता येणार

पीएमपी प्रशासनाने प्रवाशांच्या मागणीचा विचार करून गुरुवार (ता. ८) पासून पीएमपीची रातराणी सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पीएमपी प्रशासनाने प्रवाशांच्या मागणीचा विचार करून गुरुवार (ता. ८) पासून पीएमपीची रातराणी सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना अवघ्या २० रुपयांत प्रवास करता येईल. पहिल्या टप्प्यात पाच मार्गांवर रातराणीची सेवा सुरु करणार आहे. तिला चांगला प्रतिसाद मिळाला तर अन्य मार्गांवरही ही सेवा उपलब्ध होणार आहे.

पीएमपी प्रशासनाने कमी प्रतिसाद मिळत असलेल्या मार्गांवर पीएमपीची प्रवासी सेवा कमी तर काही मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्या होत्या. यात चार महिन्यांपूर्वी रातराणीची सेवा बंद केली होती. त्यामुळे रात्री उशिरा कामाच्या ठिकाणावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला. त्यांना रिक्षा व अन्य वाहतुकीच्या साधनांनी घरी जावे लागत असे. हा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे अनेक प्रवाशांनी पीएमपी प्रशासनाकडे रातराणीची सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली होती. ती आता पूर्ण होत आहे. ही सेवा रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

या मार्गांवर धावणार रातराणी...

१. कात्रज ते शिवाजीनगर (नवीन एसटी स्थानक) व्हाया स्वारगेट, शनिपार, मनपा भवन

२. कात्रज ते पुणे स्टेशन व्हाया स्वारगेट, नानापेठ, रास्ता पेठ

३. हडपसर ते स्वारगेट व्हाया वैदुवाडी, रामटेकडी, पुलगेट

४. हडपसर ते पुणे स्टेशन व्हाया पुलगेट, बॉम्बे गॅरेज, वेस्टएंड टॉकीज

५. पुणे स्टेशन ते एनडीए गेट १० व्हाया नाना पेठ, लक्ष्मी रस्ता, डेक्कन कॉर्नर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT