pmp-bus 
पुणे

पीएमपीला दिवसभरात मिळाले साडेचार लाखांचे उत्पन्न 

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहराबाहेर प्रवाशांची सुविधा व्हावी म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत सुरू केलेल्या सेवेस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पीएमपीला रविवारी दिवसभरात केवळ सात मार्गांवरील 55 बसद्वारे साडेचार लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामध्ये जेजुरी मार्गावर सर्वाधिक एक लाख 21 हजार रुपये उत्पन्न मिळाले. 

पीएमपीने 12 डिसेंबरपासून पीएमआरडीएच्या हद्दीत रांजणगाव, शिक्रापूर, जेजुरी एमआयडीसी, यवत, भूगाव, सारोळा, तळेगाव दाभाडेसह 12 मार्ग सुरू केले आहेत. या मार्गांवर एकूण 70 बस सोडण्यात येत आहेत. गेल्या दहा दिवसात प्रवासी सेवेची संख्या वाढत गेली आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी पुणे शहरात येत असतात. त्यात रविवारी ही संख्या अधिक असते. त्यामुळे रविवारी एका दिवसात पीएमपीला चार लाख 65 हजार 714 रुपये उत्पन्न प्राप्त झाले, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्रजगताप यांनी दिली. 

मार्ग उत्पन्न 
जेजुरी - एक लाख 21 हजार 395 
रांजणगाव - एक लाख 16 हजार 415 
चाकण-शिक्रापूर - 86 हजार 325 
चाकण-तळेगाव - 44 हजार 795 
यवत - 50 हजार 455 
सारोळा - 37 हजार 229 
राहू - 27 हजार 100 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT