PMPML Bus sakal
पुणे

Pune Accident : स्पीड ब्रेकरवर PMPML बस आदळली अन् महिला प्रवाशाचा मोडला मणका

स्पीड ब्रेकरवर बस आदळून एखाद्याचा मणका मोडल्याचा प्रकार तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : भरधाव पीएमपीएल बस स्पीड ब्रेकरवर (गतीरोधक) जोरात आदळून झालेल्या घटनेत एका महिला प्रवाशाचे ३ मणके मोडल्याची घटना घडली आहे. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या पुण्यातील वानवडी भागात घडली होती.या प्रकरणी आता महिला प्रवाशाने पोलिसांत तक्रार दिली असून पी एम पी एल बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, अंजुम मुनावर सिद्धकी (४४) यांनी या संदर्भात वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिद्धकी यांच्या फिर्यादीनुसार, अपघाताची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता वानवडी भागात असलेल्या गिरमे शाळेसमोर घडली. फिर्यादी आणि त्यांची बहीण सायरा (४८) या दोघी ही PMPML बस ने प्रवास करत होत्या.

यावेळी बस गिरमे शाळेसमोर आली असता बस चालकाने त्याच्या ताब्यात असलेली बस वेगाने त्या ठिकाणी असलेल्या स्पीड ब्रेकर वर आदळली. वेगात असल्यामुळे याचा हादरा ही जोरात होता. यातच सिद्धकी यांच्या पाठीला मार बसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन दाखवले असता त्यांच्या पाठीचे ३ मणके फ्रॅक्चर असल्याचे कळाले.

दरम्यान, सिद्धकी यांनी उपचार घेऊन आल्यानंतर पोलिसांत तक्रार दिल्यामुळे पी एम पी एल बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय दुबे (३२) असे या बस चालकाचे नाव असून वानवडी पोलिस ठाण्यात भारतीय दंडात्मक कलम ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT