कात्रज चौकात रात्रीच्या वेळी उभा करण्यात आलेल्या पीएमपीच्या सीएनजी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. sakal
पुणे

PMPML CNG Bus Fire : कात्रज चौकात पीएमपीच्या सीएनजी बसला आग

कात्रज चौकात रात्रीच्या वेळी उभा करण्यात आलेल्या पीएमपीच्या सीएनजी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : कात्रज चौकात रात्रीच्या वेळी उभा करण्यात आलेल्या पीएमपीच्या सीएनजी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. कात्रज अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणण्यात आली.

त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दिवसभर शहरात प्रवास करुन कात्रज डेपोच्या बस कात्रज चौकात पार्क केल्या जातात. त्यातील एका बसला ११ वाजण्याच्या सुमारास चालक उभी करुन निघून गेला. त्यानंतर काही वेळातच बोनेटमधून धूर येत असल्याचे रखवालदाराच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती तत्काळ कात्रज अग्निशमन दलाला दिली.

अग्निशमन दलाकडून तत्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये कोणही जखमी झाले नाही. आगीचे कारण समजू शकले नसल्याचे कात्रज अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. वेळेत आग आटोक्यात आणल्याबद्दल कात्रज अग्निशमन दलाचे स्थानिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: ‘अग्निवीर’प्रकरणी न्यायालयाचे केंद्राला खडेबोल; प्रतिज्ञापत्र का सादर केले नाही?

Pahalgam: पहलगामचे सूत्रधार मोकाटच; ओळख लपवून पाकिस्तानमध्ये वावर; गुप्तचरांची नजर

Pune Mumbai Missing Link : मिसिंग लिंकवर फक्त बस अन् कारच धावणार, अवजड वाहनांना नो एन्ट्री;अधिकाऱ्यांनी केली पाहणी

Property Scam in Pune : फ्लॅटचा व्यवहार ठरला, पण रक्कम न देताच परस्पर ताबा; कोंढव्यात बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक, प्रवीण ओसवालांसह भारती ओसवालांवर गुन्हा

Matthew Hayden: १९९ धावांचं लक्ष्य आणि फक्त १०० वर ऑलआउट; .हा तर लाजिरवाणा पराभव, गुजरातचे फलंदाजी प्रशिक्षक हेडन यांचा त्रागा

SCROLL FOR NEXT