Crime branch pune sakal
पुणे

पीएमपीमधील महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या टोळीला अटक

टोळीकडून सात गुन्हे उघडकीस,सहा लाख ८५ हजारांचे दागिने जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीएमपीमधील महिला प्रवाशांचे दागिने लांबविणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. टोळीकडून सात गुन्हे उघडकीस आले असून सहा लाख ८५ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सर्फराज दत्तू गायकवाड (वय ४१), योगेश गणेश माने (वय ४०), अमित नाना चव्हाण (वय २६), संतोष शरणप्पा जाधव (वय ३७), राजेंद्र ज्ञानेश्वर थेऊरकर (वय ४२, सर्व रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाढ झाली आहे. चोरीचे अनेक काही गुन्हे शहरातील विविध पोलिस ठाण्यांत दाखल आहेत. या गुन्ह्याचा छडा लावण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता.

चोरटे रिक्षातून पुणे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी चोरट्यांना पकडले. डेक्कन जिमखाना, भारती विद्यापीठ, शिवाजीनगर भागात प्रवासी महिलांचे दागिने लांबविल्याचे तपासात उघडकीस आले. चोरट्यांकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT