PMP Bus Sakal
पुणे

पुणे: खडकी-बालेवाडीत नव्या मार्गांवर पीएमपी

पीएमपीचे संचालक प्रकाश ढोरे यांच्या हस्ते दोन्ही मार्गांवरील बसचे उद्घाटन झाले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मेडिपॉइंट ते खडकी बाजार (मार्ग क्र. १२६अ/१) आणि बालेवाडी गाव ते खडकी बाजार (१२६ अ/२) या मार्गावरील पीएमपीची (PMPML) बससेवा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रविवारपासून सुरू झाली.

मेडिपॉइंट ते खडकी बाजार मार्गावरील बस वसुंधरा लॉन्स, डीपी रोड (जाताना), रिलायन्स मॉल (येताना), परिहार चौक, ब्रेमेन चौक, स्पायसर कॉलेज, बोटॅनिकल गार्डन, एलआयसी कॉलनी, डॉ. सय्यद दवाखाना, बोपोडी गणपती मंदिर, भाऊराव पाटील चौक, बोपोडी गाव, मानाजी बाग, आलेगावकर शाळा या मार्गांवरून प्रवासी वाहतूक करेल.

बालेवाडी गाव ते खडकी बाजार मार्गावरील बस देसाई पोल्ट्री फार्म, चाकणकर मळा, अभ्युदय बॅंक, ज्युपिटर हॉस्पिटल, ताम्हाणे चौक, पंपिंग स्टेशन, मेडिपॉईंट वसुंधरा लॉन्स, डीपी रोड कॉर्नर (जाताना), रिलायन्स मॉल (येताना), परिहार चौक, ब्रेमेन चौक, स्पायसर कॉलेज, बॉटनिकल गार्डन, एलआयसी कॉलनी, डॉ. सय्यद दवाखाना, बोपोडी गणपती मंदिर, भाऊराव पाटील चौक, बोपोडी गाव, मानाजी बाग, आलेगावकर शाळा या थांब्यांवर थांबेल. दोन्ही मार्गांवरील बस दर अर्ध्या ते एक तासाला उपलब्ध असेल. पीएमपीचे संचालक प्रकाश ढोरे यांच्या हस्ते दोन्ही मार्गांवरील बसचे उदघाटन झाले. या प्रसंगी वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे, वाहतूक अधिकारी चंद्रकांत वर्पे, जनसंपर्क अधिकारी सतीश गाटे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT