पुणे

पीएमपीच्या हजारो प्रवाशांच्या पासला मुदतवाढ हवी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पीएमपीच्या हजारो प्रवाशांच्या पासची लाखो रुपयांची रक्कम पीएमपीकडे जमा असून त्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचचे दत्तात्रेय फडतरे यांनी प्रशासनाकडे केली आहे. 

कोरोनामुळे पुणे, पिंपरी -चिंचवड मनपा हददी बाहेरील बससेवा 17 मार्चपासून बंद झाली आहे. 26 मे पासून पिंपरी चिंचवडमध्ये 30 मार्गांवर बससेवा सुरू झाली आहे. हजारो प्रवाशांनी पीएमपी प्रशासनाकडे पासचे पैसे अगोदर भरले आहेत. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांना बससेवेचा वापर करता आलेला नाही. त्यामुळे कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारच्या हजारो पासधारकांचे लाखो रुपये महामंडळाकडे जमा आहेत. त्यांच्या पासेसला मुदतवाढ मिळणे गरजेचे आहे. परंतू, पीएमपी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनामुळे पीएमपीला आतापर्यंत 100 कोंटीचा फटका बसला असला तरी हजारो पासधारकांचे लाखो रुपये पीएमपीकडे जमा असताना पासधारकांच्या पासची मुदतवाढ किंवा रिफंड देण्यासबंधी पी.एम.पी प्रशासनाने अजुनपर्यंत काहीही निर्णय घेतलेला नाही. टप्प्याटप्प्याने बससेवा सुरु होईल त्यानुसार पीएमपी बंद कालावधीत झालेल्या गैरसोयीचा दिलासा देण्यासाठी साठ ते नव्वद दिवसांपर्यंत पासधारकांना पासची मुदतवाढ देण्याची व्यवस्था पीएमपी प्रशासनाने करावी, अशी मागणी मंचतर्फे फडतरे यांनी पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे केली आहे. 

ज्या विद्यार्थ्यांचे लॉकडाउन काळातील वापर न केलेले पास असतील, अशा विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नवीन बोनाफाईड, ओळखपत्र काढुन नवीन पास काढण्याची सक्ती करण्यात येवु नये, असे निवेदनात म्हटले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खेड -शिवापुर टोल नाका परिसरातुन धावणाऱ्या बसेसचा टोल व्यवस्थापकांनी टोल वाढवुन मागितल्यामुळे व पीएमपीने टोल वाढवुन देण्यास नकार दिल्याने टोलनाक्यावर बसेस रोखुन धरण्यात आल्या. परिणामी पीएमपीने या भागातील लॉकडाउनपुर्वीच काही दिवस बससेवा बंद केली आहे. ती पूर्ववत सुरु करण्याबाबत विचार करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT