Dr. Amol Kolhe finally announced big announcement
Dr. Amol Kolhe finally announced big announcement sakal
पुणे

PMRDA कडून विकासकामांसाठी ८१७.५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव भीमा : शिरुर (shirur) लोकसभा मतदारसंघातील खेड( khed), शिरुर (shirur) आणि हवेली (haveli) तालुक्यातील खासदार डॉ. अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी सुचविलेल्या ८१७.५ लक्ष रुपये किंमतीच्या विविध रस्त्यांच्या कामांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ने सन २०२१-२२ च्या आराखड्यांतर्गत मंजुरी दिली आहे. (PMRDA approved funding shirur Constituency developement)

कोविड १९ चे जागतिक महामारीच्या काळात केंद्र सरकारने सन २०२०-२१ व २०२१-२२ असा दोन वर्षांचा सुमारे १० कोटी रुपयांचा खासदार निधी अन्य कामांसाठी वळविला असला तरी अन्य योजनांतून भरघोस निधी आणण्यात डॉ. कोल्हे यशस्वी झाले असून मतदारसंघातील विकासकामांचा ओघ त्यांनी कायम ठेवला आहे.

'पीएमआरडीए'च्या सन २०२१-२२ च्या आराखड्यांतर्गत शिरुर तालुक्यातील मौजे निमगाव भोगी ते सोनेसांगवी (इजिमा १४६) रस्त्याचे बांधकाम करणे (रु. १०१.०० लक्ष), मौजे गणेगाव येथील वरुडे, चिंचोशी, कान्हुरमेसाई (इजिमा १४२) रस्त्याचे बांधकाम करणे (रु. १३५.०० लक्ष), हवेली तालुक्यातील नायगाव थेऊर शिवरस्ता करणे (रु.२८१.५० लक्ष), खेड तालुक्यातील मौजे सुतारवाडी अंतर्गत प्रजिमा १७ ते सुतारवाडी रस्ता सुधारणा करणे (रु.७५.०० लक्ष), वाफगाव ते मांदळेवाडी (ग्रा.मा.७१) रस्ता करणे (रु. ७५.०० लक्ष), मौजे आखरवाडी अंतर्गत गावठाण ते ढमढेरे वस्ती रस्ता करणे (रु. ७५.०० लक्ष) आणि मौजे तोरणे येथील तोरणे पराळे जोडरस्ता (शिवरस्ता) करणे (रु.७५.०० लक्ष) आदी रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

तसेच यापूर्वी कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक प्रजिमा १९ या ३.२५० कि.मी. लांबीच्या रस्त्यापैकी कि.मी.००/०० ते कि.मी. ९५०/०० लांबीचे १० मीटर रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी साडेसहा कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे यांनी 'पीएमआरडीए'च्या माध्यमातून आतापर्यंत साडेचौदा कोटींची विकासकामे मंजूर करुन आपल्या कामांचा धडाका कायम ठेवला असल्याचे स्पष्ट होत आहे.

या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या ७-८ महिन्यांत कोविडचे संकट आले. केंद्र सरकारने २ वर्षांचा खासदार निधी रद्द केला. अशा परिस्थितीत विकासकामे करण्यासाठी लोकांच्या अपेक्षांचे खूप मोठे ओझे शिरावर होते. पण त्याही परिस्थितीत मार्ग काढून विकासाची प्रक्रिया अविरत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करीत होतो. या प्रयत्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांनी खूप मोठे मोलाचे सहकार्य केले. त्यामुळेच शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणता आला. याखेरीज शिरूरचे आमदार अॅड. अशोक बापू पवार, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही चांगली साथ दिली. त्यामुळे एकमेकांच्या सहकार्याने मतदारसंघातील विकासकामे करण्यात आम्हाला यश येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यश येत आहे, हीच समाधानाची बाब आहे, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT