पुणे

अधिकारी गैरहजर; सुविधाही वाऱ्यावर

CD

पंकज खोले : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २५ : ‘‘काही ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव, अधिकारी-कर्मचारी जागेवर नसतात. नागरिकांच्या अर्जांवर कार्यवाहीस विलंब होतो. अधिकाऱ्यांशी संपर्क होत नाही. तक्रारींची वेळेत दखल घेतली जात नाही. तसेच कार्यालय व इतर अवाजवी खर्च अशा तक्रारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) तालुकास्‍तरीय कार्यालयांबाबत पुढे आल्या आहेत. त्यामुळे ही कार्यालये दिखावाच ठरत असल्याचा आरोप अर्जदार करत आहेत.

‘पीएमआरडीए’ने नागरिकांच्या सोईसाठी तालुकानिहाय नऊ क्षेत्रीय कार्यालय सुरू केली आहेत. नागरी समस्‍या, बांधकाम परवानगी, अतिक्रमणांबाबत तक्रारी यांसह टपाल या कार्यालयातच स्‍वीकारले जावीत, असा ही कार्यालये सुरू करण्याचा उद्देश आहे. पण तेथे कनेक्टिव्‍हिटी, स्‍वच्‍छतागतृहे, अपुरी जागा आहे. वेगवेगळ्या कारणांनी अधिकारी, कर्मचारी बाहेर असतात. त्यामुळे कामे होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. यावर वैतागलेले नागरिक, अर्जदार या कार्यालयांत न जाता थेट आकुर्डी येथील मुख्य कार्यालयात जाणे पसंत करतात. हे चित्र पाहता, गाजावाजा करत सुरू केलेल्या या विभागीय कार्यालयांच्या उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे चित्र आहे.

वस्तुस्थिती
‘पीएमआरडीए’मध्‍ये येणारे नागरिक : दररोज सरासरी २५०
सर्वाधिक नागरिक : खेड, पुरंदर, मावळ, मुळशी, वेल्‍हे
दरमहा खर्च : प्रत्‍येक कार्यालयासाठी प्रत्येकी एक लाख रुपये निधी
खर्चाचे बिल : फर्निचर, संगणक आदींचे बिल वित्त विभागाकडे सादर
भाडेकरार : अनेक कार्यालयांचे बाकी
सुविधा : अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्‍शन, स्‍वच्‍छतागृहे, पार्किंग नाही

कार्यालयनिहाय मनुष्यबळ
कार्यालय / मनुष्यबळ
खेड : १ सहायक आयुक्‍त, २ शाखा अभियंता, १ लिपिक, १ शिपाई
मावळ : १ सहायक आयुक्‍त, १ सहायक महानियोजनकार, १ उपअभियंता, २ कनिष्‍ठ अभियंता, २ लिपिक, १ शिपाई
हवेली (वाघोली) : १ सहायक आयुक्‍त, १ सहा महानियोजनकार, १ उपअभियंता, २ कनिष्‍ठ अभियंता, ३ लिपिक, १ शिपाई
हवेली (औंध) : १ सहायक महानियोजनकार, १ उपअभियंता, २ कनिष्‍ठ अभियंता, १ लिपिक, १ शिपाई
दौंड : १ सहायक महानियोजनकार, १ उपअभियंता, २ कनिष्‍ठ अभियंता, १ लिपिक, १ शिपाई
शिरूर : १ सहायक महानियोजनकार, १ उपअभियंता, २ कनिष्‍ठ अभियंता, १ लिपिक, १ शिपाई
भोर, वेल्‍हे : १ सहायक महानियोजनकार, १ उपअभियंता, २ कनिष्‍ठ अभियंता, १ लिपिक, १ शिपाई
पुरंदर : १ सहायक महानियोजनकार, १ उपअभियंता, २ कनिष्‍ठ अभियंता, १ लिपिक, १ शिपाई
मुळशी : १ सहायक आयुक्‍त, १ सहायक महानियोजकार, १ उपअभियंता, २ कनिष्‍ठ अभियंता, १ शिपाई

नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा तालुकास्‍तरीय कार्यालयात नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्थानिक पातळीवरच करणे अपेक्षित आहे. बैठकांसह विविध कामांसाठी त्यांना मुख्यालयात यावे लागते. नागरिकांच्या तक्रारींनुसार कामकाजाचा आढावा घेतला जाईल.
- डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्‍त, ‘पीएमआरडीए’

तालुकास्‍तरीय कार्यालयांत नियुक्त कर्मचाऱ्यांनी तिथेच काम करावे, असे आदेश आयुक्‍तांनी दिले आहेत. बायोमेट्रिकप्रमाणे त्‍यांची हजेरीची खातरजमा केली जाते. अन्‍यथा गैरहजेरी मांडली जाते.
- रुपाली आवले-दंबे, सहआयुक्‍त, प्रशासन

नागरिक म्‍हणतात
चाकणला ‘पीएमआरडीए’चे तालुकास्‍तरीय कार्यालय आहे. पण, वेळेवर कामे होत नसल्‍याने हेलपाटे मारावे लागतात.
- दिगंबर नाणेकर, चाकण

अर्ज दिल्‍यानंतर कार्यवाहीसाठी वेळ मिळत नाहीत. त्‍यामुळे आकुर्डी कार्यालयात जावे लागते.
- वृत्तांत घोलप, चाकण

झोन दाखल्‍यासाठी तालुका कार्यालयांत प्रतिसाद मिळाला नाही. अधिकारी नसल्‍याचे सांगून टाळाटाळ केली जाते.
- महेशकुमार घुले, नेरे

PNE26W29874

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : भारतीय तिरंदाजांनी इतिहास रचला, महिला रिकर्व्ह गटात पहिलेवहिले गोल्ड! लव्हलिना बोर्गोहेनचा सुवर्ण'पंच'

Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकरांवर गोळ्या झाडणाऱ्याला अटक, गोव्याला पळ काढताना मुसक्या आवळल्या; २ फरार

Punyashlok Ahilyadevi Loan Waiver Kolhapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा तिसरा टप्पा जाहीर; पाहा तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले का?

Latest Marathi News Live Update : सीजेपीच्या मुंबईतील आंदोलनाला स्थानिकांचा विरोध

Gold Rate Today: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात मोठा बदल! 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार एवढे रुपये; पाहा ताजा भाव

SCROLL FOR NEXT