पुणे

अनधिकृत बांधकामांवर ‘पीएमआरडीए’चा हातोडा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. हद्दीतील मारुंजी, नेरे (ता. मुळशी), थेऊर (ता. हवेली), भांडगाव (ता. दौंड) आणि भिवरी (ता. पुरंदर) येथील ५४ हजार ५०७ चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. 

परवानगी न घेता सुरू केलेल्या या बांधकामांना ‘पीएमआरडीए’च्या अनधिकृत बांधकाम विभागाने संबंधितांना नोटीस बजावली होती. नोटीस बजावल्यानंतरही संबंधितांनी दुर्लक्ष करून अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे प्रमुख सारंग आवाड यांनी सांगितले. 

प्राधिकरणाच्या हद्दीत औद्योगिक प्लॉट, शेड अथवा घरांचे बांधकाम करताना प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. तसेच जुने बांधकाम असल्यास नियमितीकरणाचे अर्ज दाखल करण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. घर खरेदी करण्यापूर्वी त्यास प्राधिकरणाकडील किंवा प्राधिकरणाच्या स्थापनेपूर्वीची जिल्हाधिकाऱ्यांकडील अकृषिक परवानगीसह बांधकाम परवानगी आहे का व त्यातील मंजूर बांधकाम नकाशानुसारच आहे का, या बाबींची शहानिशा करून घर खरेदी करावे. तसेच अनधिकृत इमारतीमधील सदनिका, दुकाने घेण्यातून निर्माण होणारे आर्थिक नुकसान व फसवणूक टाळावी, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

आतापर्यंतची कारवाई
प्राधिकरणाने जानेवारी २०१५ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत २१४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. एकूण ७ लाख ३९ हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT