PMRDA sakal
पुणे

पीएमआरडीए देणार शैक्षणिक राखीव भूखंड भाडेपट्ट्याने

शैक्षणिक कारणांसाठी हद्दीत राखीव असलेले सुमारे १७ भूखंड भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

शैक्षणिक कारणांसाठी हद्दीत राखीव असलेले सुमारे १७ भूखंड भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे.

पुणे - शैक्षणिक कारणांसाठी हद्दीत राखीव असलेले सुमारे १७ भूखंड (Land) भाडेपट्ट्याने (Rent) देण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) (PMRDA) घेतला आहे. त्यानुसार इच्छुक संस्था आणि व्यक्तींकडून निविदा मागविल्या आहेत.

हे भूखंड तीस वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. पीएमआरडीएच्या हद्दीतील मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील १७ गावांमधील हे भूखंड आहेत. अमेनिटी स्पेसच्या माध्यमातून या जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आल्या आहेत.

त्यामुळे इच्छुकांना उद्यापासून एक महिन्यांच्या आत ऑनलाइन पद्धतीने या लिलावात भाग घेता येणार आहे. प्राथमिक शाळा आणि महाविद्यालयांसाठी हे भूखंड भाडेतत्वावर देण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.

ॲमेनिटी स्पेसच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पीएमआरडीएच्या ताब्यात मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात शैक्षणिक क्षेत्रासाठी राखीव असलेल्या भूखंड भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. या निर्णयामुळे पीएमआरडीएच्या हद्दीत शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

पीएमआरडीएकडून यापूर्वी ही भूखंडाचे लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता मात्र विशिष्ट क्षेत्रासाठी राखीव असलेल्या भूखंड लिलावाद्वारे भाडेपट्टाने देण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक भूखंडाचा भाडेपट्टाही पीएमआरडीएकडून निश्‍चित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT