pune bed in hospita 
पुणे

पुण्यात बेड मिळावा म्हणून आंदोलन केलेल्या रुग्णाचा मृत्यू

सूरज यादव

पुणे - कोरोनाच्या संकटात इतर आजारांवर उपचार होण्यात अनेक अडचणी येत आहेत. पुण्यात न्यूमोनिया झालेल्य तरुणाला बेड न मिळाल्यानं मंगळवारी रात्री नातेवाईकांनी अलका टॉकिज चौकात आंदोलन केलं होतं. दरम्यान, त्या तरुणाचा बुधवारी मृत्यू झाला आहे. मंगळवारी रुग्णाला घेऊन दिवसभरात 7 रुग्णालयांच्या दारात फेऱ्या मारूनही बेड मिळाला नव्हता. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू झाले होते. मात्र त्या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. कोरोना टेस्टचा अहवाल अद्याप आलेला नाही. तरुणाच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यात येईल असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. 

याबाबत मिलालेली माहिती अशी की, सिहंगड रस्त्यावरील धायरी येथे राहणाऱया 34 वर्षांच्या युवकाला न्यूमोनिया झाला होता. मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून रुग्णवाहिकेतून शहरातील विविध रुग्णालयांत ते गेले. परंतु, रात्री आठ वाजेपर्यंत त्यांना कोठेही बेड मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी टिळक चौकातील पोलिस चौकीसमोर रुग्णवाहिका उभी करून आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता. त्यावेळी पोलिसांनी संबंधित अधिकाऱयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अयशस्वी ठरला.

दरम्यान मंगळवारी महापालिकेच्या एका अधिकाऱयाने कॉंग्रेसचे कार्यकर्ते ऋषिकेश बालगुडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अनेक अधिकाऱयांना दूरध्वनी केले. त्यानंतर येरवड्यातील महापालिकेच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात त्या रुग्णाला बेड उपलब्ध झाला अन तेथे त्याच्यावर रात्री उपचार सुरू झाले. त्याआधी अलका टॉकिजजवळील एका रुग्णालयात रुग्णाला नेल्यावर बेड नाही, तुम्ही  तुमचे बघा, असे सांगण्यात आले होते. या संपूर्ण प्रकारामुळे नातेवाईक प्रचंड संतप्त झाले होते. रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल झपाट्याने कमी होत होती, तरीही रुग्णालये दिरंगाई करीत होते. वेळेवर उपचार झाले असते तर तरुणाला वाचवता आले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Attack Israel : इराणचा इस्त्रायलमधील मराठी भाषिक शहरावर हल्ला, १०० अधिक लोक जखमी झाल्याचा दावा

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा SIT चौकशी होण्याची शक्यता

Maharashtra Kesari: अंतिम फेरीत जय पाटील - हर्षवर्धन सदगीर, तर महेंद्र गायकवाड - सिकंदर शेख झुंजणार; मोहोळ, राक्षे, कोतकर यांचा पराभव

SCROLL FOR NEXT