पुणे

सावधान!..मुलांना सांभाळा...न्यूमोनिया वाढतोय 

सकाळवृत्तसेवा

पुणे- लहान मुलांमधील न्यूमोनियाचे प्रमाण यंदा 30 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. हेच या निरागस जिवांच्या मृत्यूचे मुख्य कारण आहे. कोरोनाच्या उद्रेकात आता लहान मुलांमधील न्यूमोनिया हे नव्याने आलेले आव्हान आहे, असे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांनी नोंदविले. 

हिवाळ्यात लहान मुलांना न्यूमोनिया होण्याचा धोका असतो; पण यंदा वय वर्षे 5 ते 10 मधील मुला-मुलींमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे. कोरोना संसर्ग झालेल्यांना न्यूमोनियाचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे यावर्षी न्यूमोनियाचे गांभीर्य वाढले आहे. त्यातून गुंतागुंत वाढल्याचे मत कोलंबिया एशिया हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. गणेश बागडे यांनी व्यक्त केले. 

न्यूमोनिया होण्यामागे वेगवेगळी कारणे असली तरीही मुख्यतः विषाणूजन्य संसर्ग आणि आणि जंतूसंसर्गातून हा होता. न्यूमोनियाचा त्रास प्रौढांपेक्षा लहान मुलांना अधिक होतो. त्याचे मुख्य कारण हवेतील प्रदूषण आहे. हिवाळ्यात हवेचे अभिसरण कमी झालेले असते. त्यामुळे प्रदूषक घटक जमिनीच्या लगत तरंगत असतात. हवेतील हे दूषित घटक श्‍वसनातून थेट फुफ्फुसात जातात. न्यूमोनियामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते, अशी माहिती डॉ. बागडे यांनी दिली. 

बालरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना खेर म्हणाल्या, ""न्यूमोनिया प्रतिबंधात्मक लशीचा अभाव हे भारतातील मुलांमध्ये मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. नुकतीच देशात न्यूमोकोकल कन्जुगेट लस (पीसीव्ही) सुरू झाल्यामुळे मुलांचा या आजारापासून बचाव करता येईल. लॉकडाउन आणि इतर प्रतिबंधांमुळे यावर्षी नेहमीची लसीकरण प्रक्रिया विस्कळीत झाली. अद्याप कोरोनाची लस बाजारात उपलब्ध नसल्याने जास्तीत जास्त मुलांना न्यूमोनियाची लस देण्याचा सल्ला दिला जातो.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

न्यूमोनियाचा धोका 
- लहान मुलांमध्ये तीव्र श्वसन संक्रमणाचा (एआरआय) गंभीर आजार 
- देशात सुमारे 17 टक्के बालकांच्या मृत्यूचे कारण 
- कोरोनामुळे हा आजार होण्याची शक्‍यता वाढते 

लहान मुलांमधील न्यूमोनियाची कारणे 
-कुपोषण 
-पहिल्या सहा महिन्यांत स्तनपान न होणे 
-कमी वजन आणि लसीकरणाचा अभाव 

आजाराला हेही कारणीभूत 

एखाद्या मुलास विषाणू, बॅक्‍टेरिया किंवा बुरशी जसे की स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया व हिमोफिलस इन्फ्लूएंझा प्रकार बी (एचआयबी) या दोन्ही बॅक्‍टेरियामुळे हा आजार होतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT