PNG Jewelers 
पुणे

पीएनजी बदनामी प्रकरणात सायबर पोलिसांकडे तक्रार

सनिल गाडेकर

पुणे : पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स प्रा.लि.ने कर्ज थकविले आहे. त्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ठेवीदारांनी बिशी किंवा इतर माध्यमातून केलेली गुंतवणूक काढून घ्यावी, अशी खोटी माहिती समाजमाध्यमावर पसरवणा-या अज्ञात व्यक्तीविरोधात पीएनजी ज्वेलर्स प्रा.लि.कडून सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.

पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स प्रा.लि.चे जनसंपर्क अधिकारी नीलेश कोळपकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 18 सप्टेंबर रोजी फसवा पसरवणारा मजकूर फिरला होता. पु.ना.गाडगीळचे सौरभ गाडगीळ यांनी डीएचएफएलसी या खासगी वित्तीय संस्थेचे कर्ज थकविले आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठेवीदारांनी ठेवी काढून घ्याव्यात, असे त्यात नमूद होते.

गेल्या पाच-सहा दिवसांपासून सोशल मिडीयावर खोटे मेसेज पसरवून पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सला बदनाम करण्याचे षडयंत्र केले जात आहे. व्हॉट्‌सऍपद्वारे ही पोस्ट व्हायरल झाली होती. त्यावरून सायबर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे, असे पीएनजीचे वकील पुष्कर दुर्गे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology : उशिरा का होईना पण यशस्वी होतातच 'या' तारखेला जन्मलेले लोक...नशिबात असतो अधिकारी बनण्याचा योग

Hormone Balance Tips: हार्मोन संतुलित ठेवायचे आहेत? सायली शिंदेचे खास योग व जीवनशैली टिप्स; दैनंदिन जीवनात कसे अमलात आणायचे पाहा

Latest Marathi News Live Update : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढण्यास कॅाग्रेस तयार नसल्याची सुत्रांची माहिती ..

Western Railway : विकेंडला ३०० लोकल रद्द! पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, वाचा कधी आणि का?

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उत्साह शिगेला! दोन दिवसांत तब्बल १०४६ अर्जांची विक्री, प्रत्यक्ष दाखल फक्त तीन

SCROLL FOR NEXT